सिंगापूर : अमेरिकेचे कच्चे तेल सोमवारी बॅरलमागे ४० डॉलरच्या खाली आल्यामुळे आशियाच्या बाजारातही ते स्वस्त झाले. चीनच्या अर्थव्यवस्थेची अनुत्साही वाढ आणि कच्च्या तेलाचा बाजारातील अतिरिक्त पुरवठा वाढल्यामुळे अमेरिकन तेल खाली आले.
वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठीचे तेल बॅरलमागे १.०४ अमेरिकन डॉलरने स्वस्त होऊन ३९.४१ डॉलरवर आले, तर बे्रंटचे तेल आॅक्टोबरच्या डिलिव्हरीसाठी ९१ सेंटस्ने स्वस्त होऊन ४४.५५ अमेरिकन डॉलरवर आले. वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटला न्यूयार्कमध्ये गेल्या शुक्रवारी तेल ३९.८६ अमेरिकन डॉलरवर आल्यामुळे तोटा झाला.
गेल्या सहा महिन्यांत प्रथमच तेल एवढे घसरले. जागतिक बाजारात तेलाचा अतिरिक्त पुरवठा असतानाही अमेरिकेत तेलाचे उत्पादन वाढत असल्याचे हे चिन्ह होते.