Join us  

खनिज तेल महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2016 4:12 AM

युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी उपाय योजना करण्याचा निर्वाळा दिला

सिंगापूर : ब्रिटनच्या युरोपीय संघामधून बाहेर पडण्याच्या निर्णयानंतर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी जगभरातील केंद्रीय बँकांनी उपाय योजना करण्याचा निर्वाळा दिला आहे. याचा परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमतींत शुक्रवारी वाढ झाली. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएटचे दर ३४ सेंटांनी अथवा 0.७0 टक्क्यांनी वाढूनन ४८.६७ डॉलर प्रति बॅरल झाले. ब्रेंट क्रूड तेलाचे भाव ३९ सेंटांनी अथवा 0.७८ टक्क्यांनी वाढून ५0.१0 डॉलर प्रति बॅरल झाले. (वृत्तसंस्था)