सिंगापूर : अमेरिकेकडील तयार तेलाचे साठे कमी झाल्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण झालेल्या भाववाढीत गुरुवारी ब्रेंट क्रूड तेलाचे
दर ५0 डॉलरवर गेले आहेत. २0१६मध्ये प्रथमच हे तेल इतके महागले आहे.
जुलै डिलिव्हरीसाठी झालेल्या सौद्यात ब्रेंट क्रूड तेलाचे दर ३३ सेंटने वाढून ५0.0७ डॉलर प्रति बॅरल झाले. अमेरिकी बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट तेलाचे दरही २९ सेंटने वाढून ४९.८५ डॉलर प्रति बॅरल झाले.
कच्च्या तेलाचे भाव ५0 डॉलरवर जाणे ही तेलाच्या जागतिक बाजारपेठेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजली जात आहे.
गेल्या वर्षी जूनमध्ये कच्चे तेल १00 डॉलरच्या वर होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. यंदाच्या वर्षी सुरुवातीला ते ३0 डॉलरपर्यंत घसरले . हा १३ वर्षांचा नीचांक ठरला. कॅनडामधील तेल क्षेत्रातील जंगलाला लागलेल्या आगीमुळे तेथील तेल उत्खनन ठप्प झाले. त्यामुळे तेलाच्या पुरवठ्यात मोठी घट झाली आहे. अमेरिकेतील तेलाच्या साठ्यात ४.२ दशलक्ष बॅरलची घट झाल्याने तेलबाजारात तेजी आली आहे.
खनिज तेल प्रथमच ५0 डॉलरवर
अमेरिकेकडील तयार तेलाचे साठे कमी झाल्याचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर निर्माण झालेल्या भाववाढीत गुरुवारी ब्रेंट क्रूड तेलाचे दर ५0 डॉलरवर गेले आहेत.
By admin | Published: May 27, 2016 02:01 AM2016-05-27T02:01:44+5:302016-05-27T02:01:44+5:30