Lokmat Money > बिझनेस न्यूज > खनिज तेलाचे भाव ३० डॉलरपेक्षा कमी

खनिज तेलाचे भाव ३० डॉलरपेक्षा कमी

अमेरिकी क्रूड आणि इंधन उत्पादकांनी पुरवठा वाढविल्याने आशियात गुरुवारीही खनिज तेलाचे भाव ३० डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी राहिल्याने त्यामुळे तेल बाजारातील चिंता आणखी वाढली

By admin | Published: January 15, 2016 02:54 AM2016-01-15T02:54:28+5:302016-01-15T02:54:28+5:30

अमेरिकी क्रूड आणि इंधन उत्पादकांनी पुरवठा वाढविल्याने आशियात गुरुवारीही खनिज तेलाचे भाव ३० डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी राहिल्याने त्यामुळे तेल बाजारातील चिंता आणखी वाढली

Mineral oil prices are below $ 30 | खनिज तेलाचे भाव ३० डॉलरपेक्षा कमी

खनिज तेलाचे भाव ३० डॉलरपेक्षा कमी

सिंगापूर : अमेरिकी क्रूड आणि इंधन उत्पादकांनी पुरवठा वाढविल्याने आशियात गुरुवारीही खनिज तेलाचे भाव ३० डॉलर प्रति बॅरलपेक्षा कमी राहिल्याने त्यामुळे तेल बाजारातील चिंता आणखी वाढली आहे.
८ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेच्या तेलसाठ्यात २ लाखांपेक्षा अधिक बॅरलची भर पडली असल्याचे एका ताज्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आशियात तेलाच्या किमती वाढण्याच्या शक्यतेला जबर धक्का बसला.
त्यातही अमेरिकेच्या ऊर्जा विभागाने जारी केलेल्या अहवालाची भर पडली आहे. त्यात म्हटले आहे की, गॅसोलाईन इन्व्हेंटर्सकडून ८.२ दशलक्ष बॅरलचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे साठ्यात ६.२ दशलक्ष बॅरलची भर पडली आहे.
जगात अमेरिकेत तेलाचा जास्त वापर होतो आणि तेथेच तेलाचा खप आहे. पण हा ताजा अहवाल पाहता तेथील वापर आणखी खप कमी झाला आहे. त्या तुलनेत उत्पादन वाढले आहे. फेब्रुवारीतील डिलेव्हरीसाठी वेस्ट टेक्सास इंटरमिडियटचा दर १२ सेंटनी वाढून ३०.६० अमेरिकी डॉलर झाला. त्याचवेळी ब्रेंटचा दर ४१ सेंटनी कमी होऊन तो २९.९० डॉलर प्रति बॅरल झाला.

चीनमधील मंदीमुळे खपात मोठी घट
गेल्या काही महिन्यांपासून खनिज तेलाच्या किमती सतत घसरत आहेत. जगातील क्रमांक दोनची अर्थव्यवस्था असलेल्या चीनमध्ये आलेल्या मंदीनेही तेलाचा खप कमी झाला आहे. त्यातूनही तेलाच्या बाजारात खळबळ उडाली आहे.
अमेरिकेच्या ऊर्जा विभागाच्या अहवालात यावर्षी मागणीत घट होऊन दररोज ९५.१९ दशलक्ष बॅरल राहील, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यापूर्वी दररोज ९५.२२ दशलक्ष बॅरलची मागणी राहील असा अंदाज डिसेंबरमध्ये वर्तविण्यात आला होता. त्याचवेळी या काळात वार्षिक तेल उत्पादनही वाढेल असे म्हटले होते.

Web Title: Mineral oil prices are below $ 30

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.