नवी दिल्ली : जागतिक बाजारातील चांगली मागणी आणि सुरू असलेल्या लग्नसराईमुळे सोन्याच्या भावाला सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी चमक मिळाली. ते दहा ग्रॅममागे ५५ रुपयांनी वधारून २७,१८५ रुपये झाले. चांदीही किलोमागे ९० रुपयांनी वधारून ३४,९३० रुपये झाली.चीनच्या वस्तू निर्मितीचा संकोच झाल्याची आकडेवारी समोर येताच जागतिक बाजारात गुंतवणुकीसाठी सोन्याला प्राधान्य मिळाल्यामुळे त्याच्या भावाचा कल वर जाण्याचा राहिला. याशिवाय ज्वेलर आणि रिटेलरांनी जोरदार खरेदी केल्याचा सुपरिणामही बाजारावर दिसून आला. चांदीला औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या मागणीचा लाभ मिळाला. दिल्लीतील सराफा बाजारात ९९.९ व ९९.५ टक्के शुद्धतेचे सोने १० ग्रॅममागे ५५ रुपयांनी वाढून अनुक्रमे २७,१८५ व २७,०३५ रुपये झाले. शनिवारी सोने दहा ग्रॅममागे ८० रुपयांनी वधारले होते. आठ ग्रॅमच्या नाण्याचा भाव २२,५०० रुपये असा स्थिर राहिला. नाणे निर्मात्यांकडून आणि औद्योगिक क्षेत्रातून मागणी वाढल्यामुळे तयार चांदी किलोमागे ९० रुपयांनी वाढून ३४,९३० रुपये झालीे. तर वीकली बेस्ड डिलिव्हरीची चांदी ३० रुपयांनी वाढून ३४,७२० रुपये झाली. चांदीच्या १०० नाण्यांचा भाव खरेदीसाठी ५० हजार, तर विक्रीसाठी ५१ हजार रुपये होता.
सोन्या-चांदीच्या भावात अल्प वाढ
By admin | Published: February 02, 2016 3:04 AM