देशातील कामगारांना सन्मानपूर्वक आयुष्य जगता यावे, यासाठी १९४८ मध्ये किमान वेतन कायदा लागू करण्यात आला आणि त्यात दर पाच वर्षांनी सुधारणा करण्याची तरतूद करण्यात आली. लक्झेमबर्गमध्ये सर्वाधिक किमान वेतन आहे. अशी तरतूद अनेक देशांमध्ये करण्यात आली आहे. त्यानुसार कोणत्या देशांमध्ये किती किमान वेतन मिळते, त्याचा हा आढावा...
पाकिस्तानात मिळतेय भारतापेक्षा जादा वेतनआर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानमध्ये किमान वेतन भारतापेक्षा जादा मिळते. भारतात दरमहा $९५ (सरासरी ८,००० रुपये), तर पाकिस्तानात दरमहा $१११ (सरासरी ९,१००) इतके किमान वेतन मिळते.
भारतात किमान वेतन कसे मोजतात?
देशात किमान वेतनदर हे राज्य, उद्योगक्षेत्र, विकसित किंवा अविकसित प्रदेशानुसार वेगवेगळे आहेत.२००० विविध रोजगार आणि ४०० प्रकारच्या नोकऱ्या त्यासाठी गृहीत धरल्या जातात.महागाई भत्ता, ग्राहक किंमत निर्देशांक आणि घरभाडे भत्ता आदींचा विचार करून किमान वेतन निश्चित केले जाते.उच्च कौशल्य, अर्धकौशल्य आणि अकुशल अशी कामगारांची वर्गवारीही त्यासाठी विचारात घेतली जाते.