नवी दिल्ली : सातव्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन २४ हजार रुपयांचे असेल, अशी माहिती आहे. तसेच जुलै महिन्यात वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत आता अधिकाधिक स्पष्टता होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपप्रणित भारतीय मजदूर संघाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्तीवेतन विभागाचे राज्यमंत्री जितेंद्र प्रसाद यांची भेट घेतली. प्रसाद यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्याने विचार करीत आहे. सातव्या वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मचाऱ्याचे किमान वेतन २४ हजार असावे, या प्रस्तावावर आम्ही विचार करीत आहोत.
मजूदर संघाचे विभागीय संघटनमंत्री पवनकुमार यांनी जितेंद्र प्रसाद यांच्या सोबतच्या चर्चेची माहिती दिली.
(वृत्तसंस्था)
सातव्या वेतन आयोगात किमान वेतन २४ हजार
सातव्या वेतन आयोगांतर्गत किमान वेतन २४ हजार रुपयांचे असेल, अशी माहिती आहे. तसेच जुलै महिन्यात वेतन आयोगाची अंमलबजावणी होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
By admin | Published: May 12, 2016 04:15 AM2016-05-12T04:15:31+5:302016-05-12T04:15:31+5:30