नवी दिल्ली : सॉफ्टवेअर विकास, खाण, संगमरवरी फरशी निर्मिती, सिलिंडरमध्ये गॅस भरणे, पुस्तक छपाई आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रांना कॉर्पोरेट करातील कपातीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. सवलतीच्या दरातील कॉर्पोरेट करासाठी पात्र उद्योगांच्या यादीत आणखी काही नव्या क्षेत्रांचा समावेश करण्याचा मार्ग खुला असल्याचेही सीतारामन यांनी म्हटले आहे.
कॉर्पोरेट कर ३0 टक्क्यांवरून २२ टक्के करणे आणि नव्या वस्तू उत्पादन कंपन्यांना १५ टक्केच कर लावणे यासाठी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाची जागा घेणारे ‘कर निर्धारण कायदा (सुधारणा) विधेयक’ लोकसभेत मांडण्यात आले आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. वित्तमंत्री सीतारामन यांनी सप्टेंबरमध्ये कॉर्पोरेट करातील कपातीची घोषणा केली होती. अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे थेट परकीय गुंतवणूक वाढेल, अशीही सरकारला अपेक्षा आहे.
कॉर्पोरेट करातील कपातीचा लाभ खाण क्षेत्रास नाही
सॉफ्टवेअर विकास, खाण, संगमरवरी फरशी निर्मिती, सिलिंडरमध्ये गॅस भरणे, पुस्तक छपाई आणि चित्रपट निर्मिती या क्षेत्रांना कॉर्पोरेट करातील कपातीचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्टीकरण केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 03:45 AM2019-11-27T03:45:09+5:302019-11-27T03:45:37+5:30