Lokmat Money > बिझनेस न्यूज > Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश

Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे (Infosys) एमडी आणि सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना समन्स जारी केले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2021 06:29 PM2021-08-22T18:29:33+5:302021-08-22T18:30:47+5:30

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे (Infosys) एमडी आणि सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना समन्स जारी केले आहे.

ministry of finance has summoned Salil Parekh MD and CEO Infosys | Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश

Infosys च्या सलील पारेख यांना अर्थमंत्रालयाचे समन्स; ताबडतोब हजर राहण्याचे निर्देश

नवी दिल्ली: करदात्यांना कर भरण्यास अधिक सोपे जावे, यासाठी आयकर विभागाने नवीन साइट सुरू केली. मात्र, यानंतर या साइटमध्ये अनेकविध तांत्रिक अडचणी असल्याचे समोर आले. आयकर विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे काम आयटी क्षेत्रातील मोठी कंपनी इन्फोसिसकडे आहे. मात्र, अद्यापही इन्फोसिसकडून तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या नसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाने देशातील मोठी तंत्रज्ञान कंपनी इन्फोसिसचे (Infosys) एमडी आणि सीईओ सलील पारेख (Salil Parekh) यांना समन्स जारी केले आहे. (ministry of finance has summoned Salil Parekh MD and CEO Infosys) 

गेल्या अडीच महिन्यांपासून आयकर विभागाची नवीन ई-फायलिंग पोर्टल सेवा सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही त्यातील तांत्रिक दोष दूर झालेले नाहीत. २३ ऑगस्ट २०२१ रोजी इन्फोसिसचे व्यवस्थापकीत संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सलील पारेख यांनी याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना स्पष्टीकरण द्यावे, असे समन्स बजावण्यात आले आहे. 

वंदे भारत! अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज; आपातकालीन परिस्थितीत मिळतील ‘या’ विशेष सुविधा

आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलमध्ये अनेक समस्या 

आयकर विभागाच्या नवीन ई-फायलिंग पोर्टलमध्ये अनेक समस्या येत आहेत. आयकर रिटर्न्स भरणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की, ते करदात्यांची समस्या समजून घेतात. आयकर विभागाच्या या ई-फाईलिंग पोर्टलचे काम सुरळीत होत नसल्यामुळे त्यांना समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची प्रक्रिया सुलभ, सोपी व गतिमान करण्याच्या उद्देशाने ७ जूनला सायंकाळी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्राप्तिकर ई-फायलिंग संकेतस्थळाची पहिली अनुभूती करदात्यांसाठी त्रासदायकच ठरली होती. पहिल्या दिवसापासून नवीन संकेतस्थळाबाबत तक्रारी सुरू झाल्या. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे संकेतस्थळ विकसित करणाऱ्या इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि तिचे विद्यमान अध्यक्ष नंदन नीलेकणी यांना जाहीरपणे जाब विचारत, अडचणी तात्काळ दूर करण्याचे निर्देश दिले होते. 
 

Web Title: ministry of finance has summoned Salil Parekh MD and CEO Infosys

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.