Lokmat Money > बिझनेस न्यूज > Aadhaar Card : आधार कार्डावर नावाचं स्पेलिंग चुकलंय? असा ऑनलाइन करा बदल

Aadhaar Card : आधार कार्डावर नावाचं स्पेलिंग चुकलंय? असा ऑनलाइन करा बदल

Aadhaar Card : आधार कार्डाचा वापर अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून केला जातो. अशा परिस्थितीत आधारमध्ये तुमच्या नावाचे स्पेलिंग बरोबर नसेल तर तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 06:37 PM2023-02-12T18:37:31+5:302023-02-12T18:38:01+5:30

Aadhaar Card : आधार कार्डाचा वापर अनेक ठिकाणी ओळखपत्र म्हणून केला जातो. अशा परिस्थितीत आधारमध्ये तुमच्या नावाचे स्पेलिंग बरोबर नसेल तर तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता.

Misspelled Name on Aadhaar Card Make such changes online know step by step procedure | Aadhaar Card : आधार कार्डावर नावाचं स्पेलिंग चुकलंय? असा ऑनलाइन करा बदल

Aadhaar Card : आधार कार्डावर नावाचं स्पेलिंग चुकलंय? असा ऑनलाइन करा बदल

आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाच्या कागदपत्रांपैकी एक आहे. जवळपास प्रत्येक प्रकारच्या सरकारी योजना आणि सुविधांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. मात्र, अनेकवेळा आधार कार्डमध्ये काही चुका झाल्याचे पाहायला मिळते. यातील सर्वात सामान्य चूक म्हणजे नाव किंवा त्याच्या स्पेलिंगमधील चूक.

अनेक ठिकाणी आधार कार्डचा वापर ओळखपत्र म्हणून केला जातो. अशा परिस्थितीत आधारमध्ये तुमच्या नावाचे स्पेलिंग बरोबर नसेल तर तुम्ही सरकारी सुविधांचा लाभ घेण्यापासून वंचित राहू शकता. पण तुमच्या आधार कार्डमध्ये काही चूक असेल तर तुम्ही घरी बसून ती ऑनलाइन दुरुस्त करू शकता. मात्र, यासाठी तुमच्याकडे आधार कार्डमध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे. दरम्यान, जाणून घेऊ स्टेप बाय स्टेप प्रोसिजर.

स्टेप बाय स्टेप प्रोसिजर

  • आधार कार्डमधील तुमचे नाव दुरुस्त करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाइट ssup.uidai.gov.in वर जावे लागेल आणि त्याच्या सेल्फ-सर्व्हिस अपडेट पोर्टलवर जावे लागेल.
  • यानंतर, दुसर्‍या स्टेपमध्ये तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर मिळालेला OTP टाकून लॉग इन करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला सर्व्हिस सेक्शनमध्ये जाऊन अपटेड आधार ऑनलाईनवर क्लिक करावं लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला नेम एडिटच्या ऑप्शनवर जाऊन तुमच्या नावाचं स्पेलिंग नीट करावं लागेल. यानंतर तुम्हाला सबमिटवर क्लिक करावं लागेल.

दरम्यान, आधार कार्डमधील नावाचे स्पेलिंग दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला ५० रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क भरण्यासाठी तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंगचा वापर करू शकता.

 

Web Title: Misspelled Name on Aadhaar Card Make such changes online know step by step procedure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.