Lokmat Money > बिझनेस न्यूज > मिस्त्रींना विकावे लागणार शेअर्स

मिस्त्रींना विकावे लागणार शेअर्स

समभाग विकण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार टाटा सन्सच्या घटनेतच अंतर्भूत असल्याची माहिती समोर आली

By admin | Published: March 1, 2017 04:14 AM2017-03-01T04:14:53+5:302017-03-01T04:14:53+5:30

समभाग विकण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार टाटा सन्सच्या घटनेतच अंतर्भूत असल्याची माहिती समोर आली

Mistry should sell shares | मिस्त्रींना विकावे लागणार शेअर्स

मिस्त्रींना विकावे लागणार शेअर्स


मुंबई : सायरस मिस्त्री यांना त्यांचे टाटामधील समभाग विकण्यास भाग पाडण्यासाठी आवश्यक असलेले अधिकार टाटा सन्सच्या घटनेतच अंतर्भूत असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेतील या तरतुदीनुसार टाटा सन्स एक ठराव संमत करून कोणत्याही सामान्य समभागधारकास समभाग विकायला भाग पाडू शकते.
सूत्रांनी सांगितले की, टाटा सन्सच्या घटनेचा भाग असलेल्या आर्टिकल आॅफ असोसिएशनमध्ये यासंबंधीची तरतूद आहे. या तरतुदींचा वापर करून टाटा सन्स सायरस मिस्त्री यांना त्यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या कंपन्यांचे टाटा सन्समधील समभाग विकण्यास भाग पाडू शकतात. टाटांनी काही बड्या कंपन्यांशी संपर्कही केला असल्याची माहिती आहे. त्यात एक सरकारी मालकीची फायनान्सर कंपनी, एक सरकारी मालकीचीच गुंतवणूक कंपनी आणि जगातील एक मोठी पेन्शन फंड कंपनी यांचा समावेश आहे.
मिस्त्री यांच्या कुटुंबाच्या सायरस इन्व्हेस्टमेंट आणि स्टर्लिंग इन्व्हेस्टमेंट या कंपन्यांचे १८.४ टक्के समभाग टाटा सन्समध्ये आहेत. ७५ टक्के समर्थन असलेला विशेष ठराव संमत करून समभाग विकण्यास भाग पाडण्याच्या नियमात ते बसतात. त्यांची किंमत १६ अब्ज डॉलर होऊ शकते, असे अँडी मुखर्जी यांनी म्हटले आहे. सायरस मिस्त्री यांना टाटा सन्समधून हाकलल्यानंतर मिस्त्री कुटुंबाच्या वतीने हा झगडा न्यायालयात नेण्यात आला आहे. (वाणिज्य प्रतिनिधी)
>कायद्याच्या आधारावर टिकेल?
टाटा सन्सच्या आर्टिकल आॅफ असोसिएशनमध्ये ७५व्या कलमात समभागधारकास समभाग विकण्यास भाग पाडण्याचे अधिकार टाटा सन्सला मिळाले. या अधिकारानुसार कंपनी केव्हाही विशेष ठराव संमत करून भागधारकास समभाग हस्तांतरित करण्यास सांगू शकते.स्टेकहोल्डर एम्पॉवरमेंट सर्व्हिसेसचे व्यवस्थापकीय संचालक जे. एन. गुप्ता यांनी सांगितले की, या कलमान्वये टाटा सन्सला अधिकार मिळाले. कंपनीच्या घटनेतील कलमे कंपनीसाठी कायद्यासारखीच. मात्र हे कलम कायद्याच्या आधारावर टिकण्याबाबत प्रश्नच आहे.

Web Title: Mistry should sell shares

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.