लंडन : ४.४ कोटी वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून फेसबुकवर (मेटा) ब्रिटनमध्ये २३,७२८ कोटी रुपयांचा दावा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांनी सांगितले की, वापरकर्त्यांवर अवैध अटी लादणे आणि खासगी डेटाचा वापर करून अब्जावधी डॉलरचा नफा कमावणे, असे आरोप कंपनीवर ठेवण्यात आले आहेत. भारतातही फेसबुक वादग्रस्त ठरली असून, चुकीची माहिती पसरविल्याचे आरोप कंपनीवर सातत्याने होत आले आहेत. ब्रिटनमधील फायनान्शियल कंडक्ट ऑथॉरिटीच्या (एफसीए) वरिष्ठ सल्लागार आणि प्रतिस्पर्धा कायद्याच्या तज्ज्ञ डॉ. लिझा लॉवडॅल गोर्मसन यांनी हा खटला दाखल केला आहे. गोमर्सन यांनी फेसबुकवर ‘‘क्लास ॲक्शन लॉ सूट’ प्रकारातीलच खटला भरला आहे. गोमर्सन यांनी २०१५ ते २०१९ या काळात फेसबुक वापरले होते. लंडनमधील स्पर्धा अपील लवादासमोर या खटल्याची सुनावणी होईल. मागे रशियाने प्रतिबंधित मजकूर न हटविल्याबद्दल फेसबुकला २.१७ कोटी डॉलरचा दंड ठोठावला हाेता.
वापरकर्त्यांच्या डेटाचा गैरवापर; फेसबुकवर खटला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 5:51 AM