हरीश गुप्ता
नवी दिल्ली : सरकारी मालकीच्या स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे (एसटीसी) मेटल्स अँडमिनरल्स ट्रेडिंग कॉर्पोरेशन आॅफ इंडियामध्ये (एमएमटीसी) विलीनीकरण करण्यावर काम सुरू आहे. प्रोजेक्ट अँड इक्विपमेंट कॉर्पोरेशनलाही (पीईसीला) यात विलीन केले जाण्याची शक्यता आहे. वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांनी त्यासाठी बँका व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या तिन्ही कंपन्या आयात-निर्यातीच्या व्यवहारात आहेत. एसटीसी व पीईसी सातत्याने तोट्यात, तर एमएमटीसी नफ्यात आहे. तोट्यातील सार्वजनिक उपक्रम बंद करा वा त्यांची फेररचना करा, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत.
सरकारच्या ३०० पैकी १८८ उपक्रम तोट्यात आहेत. त्यांचा तोटा २ लाख कोटींहून अधिक आहे. तोट्यातील उपक्रमांत एअर इंडिया, बीएसएनएल, एमटीएनएल, एसटीसी, आयआयएफसी, हिंदुस्तान फोटो इत्यादींचा समावेश आहे.