Join us

‘मनरेगा’तील मोबदला वेळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 5:10 AM

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाअंतर्गत लाभार्र्थींना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात सुधारणा झाली आहे.

मुंबई : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अर्थात मनरेगाअंतर्गत लाभार्र्थींना दिल्या जाणाऱ्या मोबदल्यात सुधारणा झाली आहे. विलंबाने मिळणाºया मोबदल्याची टक्केवारी केवळ १८ वर आली आहे. ७२ टक्के मोबदला वेळेत दिला आहे. विलंबामध्ये बिहार आघाडीवर आहे.‘मनरेगा’ अंतर्गत लाभार्र्थींना ९० दिवसांच्या आत कामाचा मोबदला न दिल्यास तो ‘विलंब’ श्रेणीत जातो. २०१६-१७ या आर्थिक वर्षात देशभरातील ७३ टक्के मोबदला ‘विलंब’ श्रेणीत होता. त्यांची थकबाकी २.३८ लाख कोटी होती. हा आकडा २०१७-१८ या आर्थिक वर्षात ६७,९५६ कोटींवर आला. एकूण मोबदल्यात त्याची टक्केवारी फक्त १८ टक्के राहिली. लाभार्र्थींना विलंबाने मोबदला देण्यात बिहार आघाडीवर आहे. महाराष्टÑातील ही टक्केवारी २७ इतकी असल्याचे स्टेट बँकेच्या आर्थिक संशोधन अहवालात समोर आले आहे.