Join us

अर्ध्यापेक्षाही कमी झाली Mobikwik IPO ची साईज, SEBI कडे पुन्हा केला ड्राफ्ट जमा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 12:15 PM

जुलै 2021 मध्ये 1900 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी कंपनीनं सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल केला होता.

Mobikwik IPO: पेमेंट प्लॅटफॉर्म वन मोबिक्विक सिस्टम्सनं (One MobiKwik Systems) आयपीओची (IPO) साईज कमी केली आहे. नवीन आयपीओ साईजनुसार, कंपनीनं पुन्हा ड्राफ्ट पेपर बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (SEBI) दाखल केला आहे. नवीन ड्राफ्ट पेपरनुसार, MobiKwik चा आयपीओ 700 कोटी रुपयांचा असू शकतो. यापूर्वी, कंपनीनं सुमारे अडीच वर्षांपूर्वी जुलै 2021 मध्ये 1900 कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीकडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला होता.

Mobikwik IPO चे डिटेल्स 

MobiKwik ची 700 कोटी रुपयांच्या आयपीओ अंतर्गत फक्त नवीन शेअर्स जारी करण्याची योजना आहे, याचा अर्थ विद्यमान भागधारक ऑफर फॉर सेल (OFS) विंडो अंतर्गत कंपनीतील त्यांचा हिस्सा कमी करणार नाहीत. दरम्यान, लीड मॅनेजरच्या सल्ल्यानुसार, कंपनी आयपीओपूर्वी 140 कोटी रुपयांचे शेअर्स ठेवू शकते, ज्यामुळे आयपीओचा इश्यू आकार कमी होऊ शकतो. आता आयपीओच्या पैशाच्या वापराबाबत सांगायचं झालं तर आयपीओचे 135 कोटी रुपये वित्तीय सेवांच्या वाढीसाठी, 135 कोटी रुपये डेटा आणि तंत्रज्ञानाच्या गुंतवणुकीसाठी, 70.28 कोटी रुपये पेमेंट उपकरणांच्या भांडवली खर्चासाठी वापरले जातील आणि उर्वरित पैशांचा वापर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरला जाईल.

कंपनीबाबत अधिक माहितीमोबिक्विकची सुरुवात बिपिन प्रीत सिंग आणि उपासना टाकू यांनी एकत्रितपणे केली होती. तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे दुर्गम भागात आर्थिक सेवांचा देणं हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. हे ऑनलाइन चेकआउट, क्विक क्यूआर स्कॅन, मोबिक्विक वाईब, ईडीसी मशीन आणि मर्चंट कॅश अॅडव्हान्ससारख्या सुविधा पुरवते.

टॅग्स :शेअर बाजारसेबी