Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबिक्विकचा कॅशफ्री पेमेंट्ससोबत करार, आता मिळणार 'झिप पे लेटर'ची सुविधा

मोबिक्विकचा कॅशफ्री पेमेंट्ससोबत करार, आता मिळणार 'झिप पे लेटर'ची सुविधा

पाहा काय आहे ही सुविधा.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2023 05:08 PM2023-09-01T17:08:57+5:302023-09-01T17:10:43+5:30

पाहा काय आहे ही सुविधा.

Mobikwik Ties Up With Cashfree Payments Now Get Zip Pay Letter Facility | मोबिक्विकचा कॅशफ्री पेमेंट्ससोबत करार, आता मिळणार 'झिप पे लेटर'ची सुविधा

मोबिक्विकचा कॅशफ्री पेमेंट्ससोबत करार, आता मिळणार 'झिप पे लेटर'ची सुविधा

डिजिटल बँकिंग प्लॅटफॉर्म मोबिक्विकनं पेमेंट्स आणि एपीआय बँकिंग कंपनी कॅशफ्री पेमेंट्ससोबत भागीदारीची घोषणा केली आहे. मोबिक्विक याद्वारे आपल्या वापरकर्त्यांना बिनव्याजी कर्ज देण्यासाठी कॅशफ्री पेमेंट्सचे पेमेंट गेटवेसह ‘ZIP Pay Later’ची सुविधा पुरवणार आहे.

यामुळे युझर्सना 20 हजारांपेक्षा अधिक ऑनलाइन मर्चंट्सना पेमेंट करण्यासाठी 60 हजार रुपयांपर्यंतच्या आपल्या क्रेडिट लिमिटचा वापर करता येणार आहे. झिप पे लेटर पर्याय 10 टक्के सुपरकॅशसह किमान 499 रुपये किमतीच्या डीलवर लॉन्च केले जाईल.

“आम्ही अखंडित व्यवहार करण्यात आणि ग्राहकांना माहितीपूर्ण आर्थिक निर्णय घेण्यासाठी अधिक पर्याय देऊन त्यांना सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. कॅशफ्री पेमेंट्ससोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे," अशी प्रतिक्रिया मोबिक्विकच्या चेअरपर्सन, को-फाऊंडर आणि सीओओ उपासना टाकू यांनी दिली. 

झिप पे लेटरद्वारे युझर्सना त्यांच्या क्रेडिट लिमिटसह बिल भरणा करणं, कपडे, किराणा आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या खरेदी, जेवण, औषधांच्या ऑर्डरची सुविधा देतं. या नव्या सुविधेमुळे ग्राहक, व्यापारी आणि कंपन्यांना फायदा होणार असल्याचा दावा कंपनीनं केलाय.

Web Title: Mobikwik Ties Up With Cashfree Payments Now Get Zip Pay Letter Facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.