Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाइल 93 टक्के हातात; पण संगणक केवळ 9 टक्के घरांत

मोबाइल 93 टक्के हातात; पण संगणक केवळ 9 टक्के घरांत

२ डिसेंबर रोजी संगणक साक्षरता दिन आहे. कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार देशात केवळ ९.३ टक्के घरांमध्ये संगणक पोहोचला आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 09:33 AM2022-12-02T09:33:48+5:302022-12-02T09:34:22+5:30

२ डिसेंबर रोजी संगणक साक्षरता दिन आहे. कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार देशात केवळ ९.३ टक्के घरांमध्ये संगणक पोहोचला आहे

Mobile in 93 percent hands; But only 9 percent of households have computers | मोबाइल 93 टक्के हातात; पण संगणक केवळ 9 टक्के घरांत

मोबाइल 93 टक्के हातात; पण संगणक केवळ 9 टक्के घरांत

अविनाश साबापुरे

यवतमाळ : दुनिया ‘फाइव्ह जी’च्या बाता करीत असताना भारतात मात्र १८.१२ कोटी लोक अद्यापही निरक्षर आहेत, तर ९० टक्के भारतीय घरांना अद्याप संगणकाचे दर्शनही घडलेले नाही. यावर मात करीत येत्या पाच वर्षांत शंभर टक्के साक्षरतेचे लक्ष्य गाठण्यासाठी प्रौढांना डिजिटल शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी नवभारत साक्षरता अभियानात बीएड, एमएड झालेल्या तरुणांना स्वयंसेवक म्हणून सामील करून घेतले जाणार आहे. 

२ डिसेंबर रोजी संगणक साक्षरता दिन आहे. कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार देशात केवळ ९.३ टक्के घरांमध्ये संगणक पोहोचला आहे. शहरी क्षेत्रात संगणक वापरणाऱ्यांचे प्रमाण १९.३ टक्के, तर ग्रामीण भागात ४.४ टक्के एवढे नगण्य आहे. मोबाइल वापरणाऱ्यांची संख्या ९३.३ टक्के आहे. शहरी क्षेत्रात ९६.७ टक्के, तर ग्रामीण भागात ९१.५ टक्के लोकांच्या हाती मोबाइल आहे. असे असले तरी इंटरनेटचा वापर करून व्यवहार करणाऱ्यांची संख्या निम्मीच आहे. शहरी भागातील ६४.६ टक्के आणि ग्रामीण भागातील ४१ टक्के असे ४८.८ टक्के लोकच इंटरनेटचा वापर करीत असल्याचे पुढे आले आहे. 

संगणक टायपिंगमध्ये मराठीची भीती
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने ऑक्टोबरमध्ये जाहीर केलेल्या संगणक टायपिंग परीक्षेच्या निकालानुसार, महाराष्ट्रातील मुलांना मराठी टायपिंगचीच भीती असल्याचे स्पष्ट झाले. या परीक्षेत इंग्रजी टायपिंगसाठी तब्बल १ लाख ४८ हजार ५८६ विद्यार्थी बसले होते, तर मराठी टायपिंगसाठी केवळ ५९ हजार ४४९ जण बसले होते. इंग्रजीमध्ये एक लाख ५१६ जण उत्तीर्ण झाले, तर मराठीत ४० हजार ७०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

उत्तर भारत
चंडीगड    ७५.२     ९१.९ 
दिल्ली    ६३.८     ८५.२ 
हरयाणा    ४८.४     ७२.४ 
हिमाचल प्रदेश     ४९.७     ५२.७ 
जम्मू-काश्मीर     ४३.३     ६२.० 
लडाख      ५६.४     ४७.९ 
पंजाब    ५४.८     ७८.२ 
राजस्थान     ३६.९     ६५.२ 
उत्तराखंड    ४५.१     ७४.६ 
मध्य भारत
छत्तीसगड     २६.७     ५६.३ 
मध्य प्रदेश     २६.९     ५५.७ 
उत्तर प्रदेश     ३०.६     ५९.१ 
पूर्व भारत
बिहार     २०.६     ३५.४ 
झारखंड     ३१.४     ५७.९ 
ओडिशा     २४.९     ५०.७ 
पश्चिम बंगाल     २५.५     ४१.९ 
उत्तर-पूर्व भारत
अरुणाचल प्रदेश     ५२.९     ७१.६ 
आसाम     २८.२      ३६.९ 
मणिपूर      ४४.८     ६८.५ 
मेघालय     ३४.७     ३६.५ 
मिझोराम     ३७.६     ३७.६ 
नागालँड      ४९.९     ५२.८ 
सिक्कीम     ७६.७     ६४.६ 
त्रिपुरा     २२.९     ४१.७ 
पश्चिम भारत
दादरा नगरहवेली     ३६.७     ६१.३ 
गोवा     ७३.७     ६९.७ 
गुजरात     ३०.८     ५२.६ 
महाराष्ट्र     ३८.०     ५२.९ 
दक्षिण भारत
अंदमान-निकोबार     ३४.८     ४५.६ 
आंध्र प्रदेश     २१.०     ४१.९ 
कर्नाटक     ३५.०     ५६.३ 
केरळ     ६१.१     ६२.५ 
लक्षद्वीप      ५६.३     ८०.३ 
पाँडेचरी      ६१.९     ८०.७ 
तामिळनाडू     ४६.९     ७०.२ 
तेलंगणा    २६.५     ५०.०

Web Title: Mobile in 93 percent hands; But only 9 percent of households have computers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.