Join us

Russia Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्धामुळे स्मार्टफोन अन् वाहनं महागणार, भारतीयांना मोठा धक्का! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 7:41 PM

Russia Ukraine Crisis: युक्रेन मुद्द्यावरुन रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढलेला असून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत.

Russia Ukraine Crisis: युक्रेन मुद्द्यावरुन रशिया आणि पाश्चिमात्य देशांमध्ये तणाव वाढलेला असून रशियावर अनेक आर्थिक निर्बंध लादण्यात आलेले आहेत. यामुळे रशियन कंपन्यांकडून निर्मिती केल्या जाणाऱ्या उत्पादनांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. युरोपीय देशांनी रशियावर काही आर्थिक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे. रशियानं याची पर्वा न करता युक्रेन विरुद्ध युद्धाची घोषणा केली आहे. युद्ध आणि लादण्यात आलेले निर्बंधांचा पार्श्वभूमीवर निकेल आणि अॅल्युमिनिअमचे दर याआधीच गेल्या अनेक वर्षांच्या उच्चांकावर पोहोचले आहेत. रशियाच्या कमॉडिटी एक्स्पोर्टमध्ये तांब्याचाही समावेश आहे. इतकंच नव्हे, रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे सोनं, हिरे, स्टील, कोबाल्ट आणि प्लॅटिनमचेही दर वाढण्याची दाट शक्यता आहे. 

तांब्याचा वापर करुन सेमीकंटक्टर चीप बनविण्यात येते. परंतु तांब्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आधीच चीपचा तुटवडा जागतिक बाजारपेठेत आहे. त्यात युद्धाच्या वातावरणाची आणखी भर पडली आहे. USGS नुसार, रशियाने गेल्या वर्षी ९,२०,००० टन शुद्ध तांब्याचे उत्पादन केले, जे जगातील एकूण तांब्याच्या सुमारे ३.५ टक्के आहे, त्यापैकी नॉर्निकेलने ४०६,८४१ टन तांबे तयार केले. याशिवाय, UMMC आणि रशियन कॉपर कंपनी या दोन प्रमुख उत्पादक आहेत.

मोबाइल फोन आणि वाहनं महागणारआशिया आणि युरोप ही तांब्याची निर्यात बाजारपेठ आहे. अशा परिस्थितीत चिपच्या अभावामुळे भारतालाही फटका बसू शकतो. आता तांबे महाग होणार असल्याने चिपचा वापर वाहने आणि मोबाइल फोनच्या निर्मितीमध्ये केला जातो, त्यानंतर तांब्याची उपलब्धता आणि किंमती वाढल्याने चिपसोबत येणारे फोन, वाहने आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूही महाग होऊ शकतात. एकूणच रशिया आणि युक्रेनमधील युद्धामुळे भारतासह अनेक देशांना अप्रत्यक्षपणे फटका बसणार आहे. 

स्टील महाग झाल्यानं वाहनं महागणारवर्ल्ड स्टील असोसिएशनच्या मते, रशियाने गेल्या वर्षी ७६ दशलक्ष टन स्टीलचे उत्पादन केले. हे जगातील स्टीलच्या सुमारे ४ टक्के इतके उत्पादन आहे. Severstal, NLMK, Average, MMK आणि Mekel हे प्रमुख रशियन उत्पादक आहेत. ते त्यांच्या उत्पादनापैकी निम्मे उत्पादन प्रामुख्याने युरोपला निर्यात करतात. देशात लोखंडी वस्तू बनवणारी Metalloinvest आणि स्टील पाईप्स बनवणारी TMK यांचाही या यादीत समावेश आहे.

टॅग्स :युक्रेन आणि रशियास्मार्टफोनकारवाहन उद्योग