Join us

Mobile Tariff Hike : निवडणुकांनंतर वाढणार Mobile चं बिल, पाहा किती होईल Jio, Airtel आणि Vi रिचार्ज? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 9:52 AM

Mobile Tariff Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाइल बिल महागण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून दरवाढीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

Mobile Tariff Hike : लोकसभा निवडणुकीनंतर मोबाइल बिल महागण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्यांकडून दरवाढीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ही वाढ शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात दिसून येईल. रिपोर्टनुसार, पोस्टपेडसह प्रीपेड प्लॅनमध्ये वाढ होणार असून इंटरनेट प्लान देखील पूर्वीपेक्षा महाग होऊ शकतो. 

का होणार वाढ? 

ईटीच्या रिपोर्टनुसार, मोबाइल रिचार्जमध्ये किमान २५ टक्क्यांनी वाढ होईल. प्रति युझर सरासरी महसुलाला (एआरपीयू) चालना देण्यासाठी असं पाऊल उचललं जात असल्याचे टेलिकॉम कंपन्यांचं म्हणणं आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर, प्रत्येक युझरच्या खर्चाच्या रकमेच्या तुलनेत कमाई कमी होत असल्यानं टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली जाणार आहे. 

किती रुपयांची होणार वाढ? 

अॅक्सिस कॅपिटलच्या अंदाजानुसार टॅरिफ प्लॅनमध्ये २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत २०० रुपयांचं रिचार्ज ५० रुपयांनी महागणार आहे. त्याचप्रमाणे ५०० रुपयांचं रिचार्ज १२५ रुपयांनी महागणार आहे. भारती एअरटेलसाठी बेस प्राइस २९ रुपयांनी वाढणार आहे. तसंच जिओ रिचार्जची बेस प्राइस २६ रुपयांनी वाढू शकते. जिओनं मार्च तिमाहीत १८१.७ रुपयांचा ARPU, तर ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ दरम्यान भारती एअरटेलचा ARPU २०८ रुपये, तर व्होडाफोन आयडियाचा ARPU १४५ रुपये होता. या कॅलेंडर वर्षाच्या अखेरीस ARPU १० ते १५ टक्क्यांनी वाढेल. टेलिकॉम कंपन्यांनी २०१९ ते २०२३ या कालावधीत जवळपास तीन वेळा दरवाढ केली आहे.

टॅग्स :रिलायन्स जिओएअरटेलव्होडाफोन आयडिया (व्ही)लोकसभा