लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया आणि एअरटेलसारख्या खासगी दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका देण्याच्या तयारीत आहेत. नव्या अहवालानुसार दूरसंचार कंपन्यांनी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ करण्याची तयारी सुरू केली आहे. ही वाढ तब्बल १० ते १२ टक्के इतकी असणार आहे. यापूर्वीही कंपन्यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ केली होती.
अमेरिकन इक्विटी रिसर्च फर्म, विल्यम ओ नील अँड कंपनीच्या भारतीय युनिटमधील इक्विटी रिसर्चचे प्रमुख मयुरेश जोशी यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, कंपन्या पुन्हा एकदा दरात १० ते १२ टक्के वाढ करण्याच्या तयारीत आहेत. दरवाढीमुळे यूझर प्लॅन वाढून २०० रुपये, १८५ रुपये आणि १३५ रुपये होणार आहे. याचा फटका कोट्यवधी ग्राहकांना बसणार आहे. एअरटेलचे सीईओ गोपाळ विठ्ठल यांनी प्रीपेड प्लॅन्सच्या किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले होते. कंपनी प्रति ग्राहक आपला महसूल वाढवण्याची तयारी करत आहे.
८४ दिवसांच्या प्लॅनसाठी किती रुपये?n नोव्हेंबर २०२१ मध्ये एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने आपल्या प्रीपेड प्लॅनच्या किमतीत २० ते २५ टक्क्यांची मोठी वाढ केली होती. n यानंतर रिलायन्स जिओनेही किंमत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे ७९ रुपयांच्या प्लॅनची किंमत वाढून ९९ रुपये झाली होती; तर ८४ दिवसांच्या वैधतेच्या एअरटेलच्या प्लॅनची किंमत ६९८ रुपयांवरून वाढून तब्बल ८३९ रुपये झाली होती.
११६.६९ कोटी ।
शहरी ग्राहक ६४.७१ कोटीग्रामीण ग्राहक ५१.९८ कोटी
कुणाकडे किती ग्राहकजिओ ४०.९२कोटीएअरटेल २१.५२कोटीव्हीआय १२.२४ कोटीबीएसएनएल २.७१कोटी