Join us

तुमच्या घराच्या गच्चीवर मोबाईल टॉवर लावण्यासाठी फोन आला तर सावध व्हा! TRAI कडून लोकांना अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 12:56 PM

TRAI Fraud Alert : तुमच्या घराच्या गच्चीवर मोबाईल टॉवर लावतो म्हणून तुम्हाला फोन आला तर सावध व्हा. कारण, असं सांगून अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.

TRAI Fraud Alert : गेल्या काही वर्षात आर्थिक फसवणुकीचे अनेक प्रकार समोर आलेत. काही तर असे आहेत की सुशिक्षित लोकही याला बळी पडत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार सध्या अनेक भागात घडताना पाहायला मिळत आहे. तुमच्या घरावरील टेरेसवर किंवा मोकळ्या जागेत मोबाईल नेटवर्कचा टॉवर लावू असं आमिष दाखवून लोकांना आर्थिक गंडा घातला जात आहे. या गुन्ह्याची दखल आता थेट दूरसंचार नियामक प्राधिकरणानेही (TRAI) घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रायकडून लोकांना अलर्ट पाठवण्यात आला आहे. 

TRAI कडून लोकांना SMS अलर्टभारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच TRAI ने मोबाईल टॉवरच्या नावावर होत असलेल्या फसवणुकीबद्दल एसएमएसद्वारे लोकांना सतर्क केले आहे. TRAI कडून पाठवल्या जाणाऱ्या SMS मध्ये आमच्याकडून कोणतीही NOC दिली जात नसल्याचे स्पष्ट केलं आहे. TRAI चा SMS पुढीलप्रमाणे :  लक्षात ठेवा की TRAI मोबाईल टॉवर उभारण्यासाठी NOC जारी करत नाही. अशा पत्राद्वारे कोणी फसवणूक करून तुमच्याशी संपर्क साधल्यास संबंधित मोबाइल सेवा कंपनीला याची माहिती द्या.

पीआयबी फॅक्टचेककडूनही इशाराया महिन्याच्या सुरुवातीला, PIB Factcheck ने लोकांना मोबाईल टॉवर इंस्टॉलेशनच्या फसवणुकीबद्दल इशारा दिला होता. मोबाईल टॉवर बसवण्यासाठी दूरसंचार विभागाच्या नावाने लोकांना बनावट एनओसी दिली जात असून त्याबदल्यात त्यांची फसवणूक केली जात असल्याचे पीआयबी फॅक्टचेकने म्हटले होते. दूरसंचार विभागाकडून कुठलेही शुल्क किंवा टॅक्स आकारला जात नाही, असंही पीआयबी फॅक्टचेकने सांगितलं आहे.

टॉवर फ्रॉडची मोडस ऑपरेंडी कशी आहे?ग्राहकांना हेरुन त्यांना तुमच्या गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत मोबाईल नेटवर्क कंपनीचा टॉवर उभारण्याची ऑफर दिली जाते. यातून चांगले मासिक उत्पन्न मिळत असल्याने नागरीकही आकर्षित होतात. या ट्रॅपमध्ये अनेकजण अडकतात. मग त्यांना ट्राय किंवा टेलिकॉम विभागाच्या नावाने बनावट एनओसी दिली जाते. त्याबदल्यात मोठी रक्कम घेतली जाते.

मोबाईल नंबर व्हेरीफिकेशनच्या नावाखाली फसवणूकट्रायने काही काळापूर्वी मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनच्या फसवणुकीबाबत लोकांना सतर्क केले होते. कुठलीही मोबाईल कंपनी व्हेरीफिकेश/डिस्कनेक्शन/बेकायदेशीर कृतींची तक्रार करण्यासाठी कोणताही संदेश किंवा कॉल पाठवत नाही. ट्रायच्या नावाने येणाऱ्या अशा मेसेज/कॉलपासून सावध राहा. असा कोणताही कॉल किंवा मेसेज आल्यास त्यावर विश्वास ठेऊ नये. असा काही मॅसेज तुम्हाला आला तर संचारसाथी प्लॅटफॉर्मवरील चक्षू मॉड्यूलद्वारे (https://sancharsaathi.gov.in/sfc/) किंवा सायबर क्राईम पोर्टलवर (http://www.cybercrime.gov.in) दूरसंचार विभागाला याची माहिती द्या.

टॅग्स :सायबर क्राइमगुन्हेगारीधोकेबाजी