लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: जगभरात गेल्या अलीकडच्या काळात सेमिकंडक्टर चिपची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहन उद्योग, संगणक तसेच स्मार्टफोन उत्पादनावर परिणाम झाला होता. या संकटावर मात करण्यासाठी भारत आणि अमेरिका एकत्र काम करणार आहेत. दोन्ही देश मिळून जगभरात सेमिकंडक्टर पुरवठा करणार आहेत. यासाठी भारत आणि अमेरिकेमध्ये सामंजस्य करार झाला.
अमेरिकेच्या वाणिज्य मंत्री जीना रायमोंडो भारत दौऱ्यावर होत्या. त्यावेळी भारत आणि अमेरिकेदरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. सेमिकंडक्टर चिप उत्पादनात तैवान आघाडीवर आहे. मात्र, जग चिप पुरवठ्यासाठी चीनवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. म्हणूनच अमेरिकन कंपन्या भारतीय कंपन्यांसोबत चिप उत्पादनासाठी काम करण्यास इच्छूक आहेत. त्यासाठी १ हजार कोटी रुपयांची प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली आहे. भारतातच चिप उत्पादन झाल्यामुळे गैजेट्स, संगणक, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, वाहने इत्यादी वस्तू स्वस्त होतील.
- १.७६ लाख कोटींची चिप भारतात होते आयात
- करारानंतर चीनवरील अवलंबित्व कमी होईल
- अंदाजे १ लाख लोकांना मिळतील नोकया
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"