Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगभरात जातात भारतात तयार झालेले माेबाइल; निर्यात पाेहाेचली ६.५ अब्ज डाॅलरवर

जगभरात जातात भारतात तयार झालेले माेबाइल; निर्यात पाेहाेचली ६.५ अब्ज डाॅलरवर

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 11:41 AM2024-08-23T11:41:50+5:302024-08-23T11:42:31+5:30

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे. 

Mobiles made in India go all over the world; Exports stood at 6.5 billion dollars | जगभरात जातात भारतात तयार झालेले माेबाइल; निर्यात पाेहाेचली ६.५ अब्ज डाॅलरवर

जगभरात जातात भारतात तयार झालेले माेबाइल; निर्यात पाेहाेचली ६.५ अब्ज डाॅलरवर

नवी दिल्ली : माेबाइल उत्पादनाचे हब बनण्याच्या दिशेने भारताची सकारात्मक वाटचाल सुरू आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ६.५ अब्ज डाॅलरवर भारतात उत्पादित माेबाइलची निर्यात झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४० टक्के एवढी घसघशीत वाढ झाली आहे. 

ॲपल, सॅमसंग, शाओमी इत्यादी कंपन्यांचे भारतात माेबाइल उत्पादन माेठ्या प्रमाणावर हाेत आहे. देशात तयार झालेल्या माेबाइलची निर्यात सातत्याने वाढत आहे. माेबाइल फाेनच्या एकूण निर्यातीमध्ये अॲपलचा वाटा ७० टक्के असल्याचे आकडेवारीतून दिसते. 

इलेक्ट्राॅनिक उत्पादनात झाली दुप्पट वाढ
देशातील एकूण इलेक्ट्राॅनिक उत्पादन गेल्या ७ वर्षांमध्ये दुप्पट झाले आहे. 
२०१७ मध्ये ४८ अब्ज डाॅलर एवढे उत्पादन हाेते. ते २०२३ च्या आर्थिक वर्षात १०१ अब्ज डाॅलरवर पाेहाेचले आहे.
त्यात सर्वाधिक ४३ टक्के वाटा माेबाइल फाेनचा आहे.

Web Title: Mobiles made in India go all over the world; Exports stood at 6.5 billion dollars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.