Lokmat Money > बिझनेस न्यूज > “हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये काहीच दम नव्हता, अदानीं समूहाबाबत अतिशयोक्ती करण्यात आली” 

“हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये काहीच दम नव्हता, अदानीं समूहाबाबत अतिशयोक्ती करण्यात आली” 

Mobius Capital on Hindenburg Research Report About Adani Group: हिंडेनबर्गने अनेक गोष्टी अतिशयोक्ती करून दाखवल्या, असे मत व्यक्त करत एका कंपनीने अदानी समूहाची पाठराखण केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 11:42 AM2023-04-15T11:42:42+5:302023-04-15T11:43:54+5:30

Mobius Capital on Hindenburg Research Report About Adani Group: हिंडेनबर्गने अनेक गोष्टी अतिशयोक्ती करून दाखवल्या, असे मत व्यक्त करत एका कंपनीने अदानी समूहाची पाठराखण केली आहे.

mobius capital founder mark mobius says whole thing was overblown by hindenburg research report about adani group | “हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये काहीच दम नव्हता, अदानीं समूहाबाबत अतिशयोक्ती करण्यात आली” 

“हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये काहीच दम नव्हता, अदानीं समूहाबाबत अतिशयोक्ती करण्यात आली” 

नवी दिल्ली: २४ जानेवारी २०२३ रोजी अमेरिका स्थित हिंडेनबर्ग संस्थेने अदानी समूहाबाबत एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामुळे जगभरात एकच खळबळ उडाली. यानंतर अदानी समूहाचे शेअर्स प्रचंड प्रमाणात कोसळले. गौतम अदानी यांच्या संपत्तीत घट होऊन श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते अनेक पायऱ्या खाली उतरले. अदानी समूहात गुंतवणूक केलेल्यांनाही प्रचंड नुकसान सोसावे लागले. मात्र, यातच आता हिंडेनबर्ग रिपोर्टमध्ये काहीच दम नव्हता, अदानीं समूहाबाबत अतिशयोक्ती करण्यात आली, असे सांगत अदानी समूहाची पाठराखण करण्यात आली आहे. (Mobius Capital on Hindenburg Research Report About Adani Group)

मोबियस कॅपिटलचे मार्क मोबियस यांनी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मला वाटते की हिंडेनबर्गने अदानी समूहाबाबत अतिशयोक्ती केली असावी, मला वाटत नाही की हिंडनबर्गचा अहवाल पूर्णपणे अचूक होता. अदानी कुटुंबाचा सहभाग आणि कंपनीचे मोठे कर्ज हे हिंडनबर्ग अहवाल येण्यापूर्वीच माहिती होते. कंपनीत कुटुंबाचा सहभाग असल्याचे सर्वांनाच माहीत असल्याचे त्यांनी सांगितले. ही काही लपलेली गोष्ट नव्हती. जास्त कर्जाची वस्तुस्थितीही सार्वजनिक होती, असे सांगत मार्क मोबियस यांनी अदानी समूहाला पाठिंबा दर्शवला. 

हिंडेनबर्गने अनेक गोष्टी अतिशयोक्ती करून मांडल्या

भारतीय बँकांमधून अदानी समूहाने मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे.  म्हणूनच बँका अदानी समूहाला पाठिंबा देतील. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, इंडसइंड बँक आदींनी अदानी समूहाला कर्ज दिले आहे. असे असूनही हिंडेनबर्गने सर्वकाही गोष्टी अतिशयोक्ती करून मांडल्या. अदानी समूहाकडील मोठ्या प्रमाणावर असलेल्या कर्जामुळेच आम्ही त्यापासून दूर राहिलो. अदानीसमोरचा प्रश्न नक्कीच कर्जाचा होता. कर्जाचे प्रमाण खूप जास्त होते. आम्ही अदानी समूहापासून दूर राहण्याचे हे एक कारण आहे. आम्ही छोट्या कंपन्या तसेच मध्यम आकाराच्या कंपन्यांवर लक्ष केंद्रित करतो. आमचा कठोर नियम आहे की, आम्ही जास्त कर्ज असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत नाही, असे मार्क मोबियस यांनी स्पष्टपणे सांगितले. तसेच काही गुंतवणूकदारांनी, विशेषत: राजीव जैन यांनी अदानी समूहामध्ये भरपूर पैसे गुंतवले आहेत कारण त्यांना वाटते की ते दीर्घकालीन फायद्याचे असेल, असेही मार्क यांनी म्हटले आहे. ते बिझनेस टुडेशी बोलत होते. 

दरम्यान, हिंडेनबर्गचा अहवाल अदानी एंटरप्रायझेसचा एफपीओ सुरू होण्याच्या तीन दिवस आधी आला होता, ज्यामध्ये अदानी समूहावर स्टॉकमध्ये फेरफार, खात्यातील फसवणूक यासारखे गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर अदानी समूहाने हिंडेनबर्गचा रिपोर्ट पूर्णपणे फेटाळला. तसेच एफपीओ मागे घेतला. अदानी समूह तीन कंपन्यांच्या अधिग्रहण करारातूनही बाहेर पडला. यानंतर अदानी समूहाने कर्जफेडीवर अधिकाधिक भर देऊन कोट्यवधी रुपयांचे कर्ज फेडले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: mobius capital founder mark mobius says whole thing was overblown by hindenburg research report about adani group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.