मुलांसाठी रचावी लागेल आधुनिक कविता
By admin | Published: June 29, 2015 12:38 AM
मुलांसाठी रचावी लागेल आधुनिक कविता
मुलांसाठी रचावी लागेल आधुनिक कविता सागर, मध्य प्रदेशचे ज्येष्ठ साहित्यिक आणि अधिवक्ता महेंदरकुमार फुसकेले म्हणाले, यांत्रिकीकरण आणि जटिलता असलेल्या आजच्या समाजात मुलांसाठी पोपट आणि राजा-राणीच्या कथा अव्यावहारिक होत आहेत. त्यांच्या बौद्धिक विकासाला यातून चालना मिळू शकत नाही. त्यामुळे कवी आणि लेखकांना आता आधुनिक काळाप्रमाणे मुलांसाठी कविता आणि कथा लिहाव्या लागणार आहेत. ८२ वर्षांचे फुसकेले सागर येथे कामगारांचे ज्येष्ठ नेता आहेत. कामगारांकडून न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांचे कार्य ते वकील म्हणून करीत आहेत. ते अनेक वर्षे हरिसिंह गौर विद्यापीठ, सागरच्या विद्वत् परिषदेचे सदस्य आणि कार्यकारिणी सदस्य होते.