Join us

मालदीवला मिरच्या झोंबणार! अर्थमंत्र्यांची लक्षद्वीपसाठी मोठी घोषणा, मोईज्जूंचा तोरा उतरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2024 1:34 PM

Budget 2024 Investments For Lakshadweep एकाच दगडात दोन पक्षी... आधीच भारतीयांनी बुकिंग रद्द करून धक्का दिलाय, मोदी सरकारकडून कायमचा सुरुंग लावण्याची तयारी...

पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावेळी मालदीवने भारतावर टीका केली होती. त्यांचे पर्यंटन किती चांगले आहे हे भारताच्या जीवावर जगणाऱ्या मालदीवच्या सरकारने दाखविण्याचा प्रयत्न केला होता. त्याला भारतीयांनी मालदीवच्या टूर रद्द करून धक्का दिलेला असतानाच आता मोदी सरकारने आजच्या बजेटमध्ये सुरुंग लावणारी घोषणा केली आहे. 

मालदीवमध्ये चीन धार्जिने मोईज्जू यांचे सरकार आले आहे. मोईज्जू यांनी मालदीवमध्ये मदतीला असलेले भारतीय सैन्य माघारी घेण्याची मुदत भारताला दिली आहे. यातच मोदी यांनी लक्षद्वीपचा दौरा केला होता, तेव्हा त्यावरून मालदीवच्या मंत्र्यांनी यावर टीका केली होती. यामुळे मोठा वाद सुरु झाला होता. भारतीयांनी मालदीवच्या सर्व बुकिंग रद्द करून टाकल्या होत्या. मोदी सरकारने मालदीवला कायमस्वरुपी धक्का देण्याचा प्लॅन आखला आहे. 

सरकार देशातील पर्यटन क्षेत्रात लक्षणीय गुंतवणूक करेल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. केंद्रशासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीप बेटांवर पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी सरकार विशेष लक्ष देईल अशी घोषणा सीतारामन आंनी केली आहे. 

मालदीवसोबतच्या वादानंतर हजारो भारतीयांनी लक्षद्वीपला जाण्याचे ठरविले आहे. मालदीवपेक्षा लक्षद्वीप कित्येक पटींनी सुंदर आहे. त्याचा फायदा आता केंद्र सरकार उचलणार आहे. तसेच मालदीवला धडा शिकविण्यासाठी व भारतीयांचा पैसा भारतातच खेळविला जाण्यासाठी मोदी सरकारने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. 

टॅग्स :बजेट क्षेत्र विश्लेषणकेंद्रीय अर्थसंकल्प 2019अर्थसंकल्प 2024मालदीवनिर्मला सीतारामन