मोदी सरकार देशातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य करत असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. केंद्र सरकारकडून पीएम नारी शक्ती योजनेद्वारे देशातील महिलांना 2.20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करत असल्याचे या मेसेजमध्ये दिले आहे. तसेच या मेसेजमध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी रजिस्टर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खरच केंद्र सरकारकडून अशी कोणती योजना राबवण्यात आली आहे का? चला जाणून घेऊ या मेसेज मागचे सत्य काय आहे.
Sula Vineyards IPO : 'या' Wine कंपनीचा 12 डिसेंबरला आयपीओ उघडणार; 1000 कोटी जमा करण्याची तयारी सुरू!
या मेसेज संदर्भात पीआयबीने एक ट्विट करुन माहिती दिली आहे. पीआयबीने ही माहिती खोटी असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरू करण्यात आली नसल्याचे यात म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज फेक आहे. पीआयबी या संदर्भात वेळोवेळी माहिती देत असते. या संदर्भात येणाऱ्या मेसेजवर क्लिक न करण्याच्या सूचना यात देण्यात आल्या आहेत.
'इंडियन जॉब' नामक #YouTube चैनल द्वारा यह दावा किया जा रहा है कि केंद्र सरकार सभी महिलाओं को 'प्रधानमंत्री नारी शक्ति योजना' के तहत 2 लाख 20 हजार रूपए देने जा रही है।#PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) December 6, 2022
▶️यह दावा #फर्जी है।
▶️केंद्र सरकार द्वारा ऐसी कोई योजना नहीं लाई गई है। pic.twitter.com/FL3Ji8Oydc
तुम्हाला असा कोणताही संशयास्पद मेसेज मिळाल्यास, तुम्ही नेहमी त्याची सत्यता तपासू शकता आणि ही माहिती खरी आहे की खोटी आहे हे तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in वर मेसेज करावा लागेल. ही माहिती तपासणीसाठी +918799711259 वर WhatsApp मेसेज पाठवू शकता. तुम्ही तुमचा मेसेज pibfactcheck@gmail.com वर देखील पाठवू शकता. या महितीची सत्यता तपासण्यासाठी https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.