Join us

CoronaVirus News: लॉकडाऊनमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांवर संकट; PF व्याजदरात कपात, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2020 11:23 AM

सरकारी कर्मचा-याला निवृत्तीच्या वेळी जीपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेचा निश्चित भाग मिळतो.

ठळक मुद्देजीपीएफबद्दल मोठी घोषणा करत केंद्र सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून तिमाही) व्याजदरात कपात केली आहे. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत जीपीएफ आणि इतर फंडांवर आता 7.1% व्याज मिळणार आहे, जे आधी 7.9% एवढे मिळत होते. जीपीएफ किंवा जनरल प्रॉव्हिडंट फंड हे एक भविष्य निर्वाह निधी खाते आहे, जे केवळ सरकारी कर्मचारीच उघडू शकतात.

नवी दिल्ली: जनरल प्रॉव्हिडंट फंड (जीपीएफ)बद्दल मोठी घोषणा करत केंद्र सरकारने नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून तिमाही) व्याजदरात कपात केली आहे. 1 एप्रिल 2020 ते 30 जून 2020 पर्यंत जीपीएफ आणि इतर फंडांवर आता 7.1% व्याज मिळणार आहे, जे आधी 7.9% एवढे मिळत होते.  जीपीएफ किंवा जनरल प्रॉव्हिडंट फंड हे एक भविष्य निर्वाह निधी खाते आहे, जे केवळ सरकारी कर्मचारीच उघडू शकतात. निवृत्तीनंतरची ही एक प्रकारची गुंतवणूक असते. कारण सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याला ही रक्कम मिळते. सरकारी कर्मचारी त्यांच्या पगाराच्या 15 टक्क्यांपर्यंत जीपीएफ खात्यात योगदान देऊ शकतात.सर्वात खास वैशिष्ट्यजीपीएफ खात्याशी संबंधित एक खास वैशिष्ट्य आहे, ज्याला जीपीएफ अ‍ॅडव्हान्स असे म्हटले जाते. जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या बचतीखाली देण्यात आलेले हे व्याजरहित (व्याजमुक्त) कर्ज आहे. या कर्जाची रक्कम नियमित मासिक हप्त्यांमध्ये फेडता येते. जीपीएफ खात्यातून अगोदर काढलेल्या रकमेवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. आपण आवश्यक तितके जीपीएफ अ‍ॅडव्हान्स घेऊ शकता.जीपीएफ खाती किती प्रकारची आहेत?>> जीपीएफ (केंद्रीय सेवा) - सामान्य भविष्य निर्वाह निधी (केंद्रीय सेवा)

- >> सहयोगी पीएफ (भारत)

>> अखिल भारतीय सेवा पीएफ-अखिल भारतीय सेवा भविष्य निर्वाह निधी

>> राज्य रेल्वे पीएफ-राज्य रेल्वे भविष्य निर्वाह निधी

>> जनरल पीएफ (डिफेन्स सर्व्हिसेस) - जनरल प्रॉव्हिडंट फंड (डिफेन्स सर्व्हिसेस)

>> भारतीय आयुध विभाग पीएफ-भारतीय आयुध विभाग भविष्य निर्वाह निधी

>> इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीज वर्कमेन पीएफ-इंडियन ऑर्डनेन्स फॅक्टरीज वर्कर्स प्रॉव्हिडंट फंड

>> इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमन पीएफ-इंडियन नेव्हल डॉकयार्ड वर्कमेन प्रॉव्हिडंट फंड

>> संरक्षण सेवा अधिकारी पीएफ-संरक्षण सेवा अधिकारी भविष्य निर्वाह निधी

>> सशस्त्र सेना वैयक्तिक पीएफ-सशस्त्र सेना कर्मचारी भविष्य निर्वाह निधीपेन्शन खातेकरतज्ज्ञ अनिल के. श्रीवास्तव यांच्या म्हणण्यानुसार, सरकारी कर्मचा-याला निवृत्तीच्या वेळी जीपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेचा निश्चित भाग मिळतो. त्यासाठी निवृत्तीवेतनातून काही रक्कम देण्याचा पर्याय देखील आहे. जे त्यांना दरमहा पेन्शन म्हणून मिळतात.वारसदारा(नॉमिनी)चा पर्यायजीपीएफ खाते उघडताना एखादा कर्मचारी कुटुंबातील सदस्याला नॉमिनीदेखील बनवू शकतो. खातेदारांसोबत काही अनुचित घडल्यास नॉमिनीला जीपीएफ खात्याची रक्कम मिळते.कोण खाते उघडू शकेल?भारत सरकारमधील कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी जनरल भविष्य निर्वाह निधीमध्ये त्यांचे खाते उघडू शकतात. हे खाते एका विशिष्ट उत्पन्न गटाच्या कर्मचार्‍यांसाठी आवश्यक आहे. खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी या खात्यास पात्र नाहीत.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus: कौतुकास्पद! सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी १००० कुटुंबांना दिलं धान्य

पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

CoronaVirus News: लॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार

CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

टॅग्स :भविष्य निर्वाह निधीकोरोना वायरस बातम्या