Lokmat Money > बिझनेस न्यूज > IDBI Bank: मोदी सरकारकडून या बँकेतील भागीदारी विकण्याची तयारी, एलआयसीही विकणार शेअर 

IDBI Bank: मोदी सरकारकडून या बँकेतील भागीदारी विकण्याची तयारी, एलआयसीही विकणार शेअर 

IDBI Bank News: केंद्र सरकार आणि एलआयसी आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारी विकण्याचा विचार करत आहे. दोघांच्याही अधिकाऱ्यांमध्ये एकूण किती भागीदारी विकावी, याबाबतची चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 04:00 PM2022-08-24T16:00:10+5:302022-08-24T16:00:52+5:30

IDBI Bank News: केंद्र सरकार आणि एलआयसी आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारी विकण्याचा विचार करत आहे. दोघांच्याही अधिकाऱ्यांमध्ये एकूण किती भागीदारी विकावी, याबाबतची चर्चा सुरू आहे.

Modi government is ready to sell stake in this bank, LIC will also sell share | IDBI Bank: मोदी सरकारकडून या बँकेतील भागीदारी विकण्याची तयारी, एलआयसीही विकणार शेअर 

IDBI Bank: मोदी सरकारकडून या बँकेतील भागीदारी विकण्याची तयारी, एलआयसीही विकणार शेअर 

नवी दिल्ली - केंद्र सरकार आणि एलआयसी आयडीबीआय बँकेमधील आपली भागीदारी विकण्याचा विचार करत आहे. दोघांच्याही अधिकाऱ्यांमध्ये एकूण किती भागीदारी विकावी, याबाबतची चर्चा सुरू आहे. आयडीबीआय बँकेमध्ये केंद्र सरकार आणि एलआयसी यांचे मिळून ९४ टक्के शेअर आहेत. याबाबतचं वृत्त मनीकंट्रोलने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयडीबीआय बँकेमधील एकूण ५१ टक्के भागीदारी विकण्याचा विचार सरकारकडून सुरू आहे. मात्र याबाबत अद्याप कुठलंही अधिकृत विधान समोर आलेलं नाही. या शेअरच्या विक्रीबाबतचा अंतिम निर्णय हा मंत्रिगट घेणार आहे. सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत केंद्र सरकार याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

आयडीबीआय बँकेमध्ये सरकारची ४५.४८ तर एलआयसीची ४९.२४ टक्के भागीदारी आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार आयडीबीआयमधील काही भागादारी सरकार आणि काही भागीदारी एलआयसी विकणार आहे. त्यासोबतच खरेदीदारांना व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली जाईल. तसेच आरबीआयसुद्धा ४० टक्क्यांहून अधिकची भागीदारी खरेदी करण्यास मान्यता देऊ शकते. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी हल्लीच सांगितले आहे की, सरकारी बँकांच्या खासगीकरणाबाबत आरबीआयची भूमिका तटस्थ आहे.

दरम्यान, आयडीबीआय बँकेमधील भागीदारी विकण्याचे वृत्त आल्यापासून बँकेच्या शेअरमध्ये तेजी दिसून येत आहे. आतापर्यंत आयडीबीआय बँकेचे शेअर ३.२१ टक्क्यांनी उसळी घेत ४०.२५ रुपयांवर ट्रेंड करत आहेत.बुधवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये शेअरचा भाव ४१ रुपयांच्या स्तरापर्यंत पोहोचू शकतो. 

Web Title: Modi government is ready to sell stake in this bank, LIC will also sell share

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.