Lokmat Money > बिझनेस न्यूज > आधी बँका, आता इंधन कंपन्यांचं होणार मर्जर; ‘या’ नावांचा मोदी सरकारचा प्रस्ताव

आधी बँका, आता इंधन कंपन्यांचं होणार मर्जर; ‘या’ नावांचा मोदी सरकारचा प्रस्ताव

HPCL-MRPL Merger: बँकांनंतर आता मोदी सरकार दोन पेट्रोलियम कंपन्यांच्या विलिनीकरणाची तयारी करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2023 07:58 PM2023-05-24T19:58:09+5:302023-05-24T20:00:56+5:30

HPCL-MRPL Merger: बँकांनंतर आता मोदी सरकार दोन पेट्रोलियम कंपन्यांच्या विलिनीकरणाची तयारी करत आहे.

modi government now preparations for the merger of hpcl mrpl | आधी बँका, आता इंधन कंपन्यांचं होणार मर्जर; ‘या’ नावांचा मोदी सरकारचा प्रस्ताव

आधी बँका, आता इंधन कंपन्यांचं होणार मर्जर; ‘या’ नावांचा मोदी सरकारचा प्रस्ताव

HPCL-MRPL Merger: केंद्रातील मोदी सरकारने काही सरकारी कंपन्यांचे खासगीकरण आणि विलिनीकरण केले आहे. यातच सरकारी कंपन्यांचे खासगीकरण तसेच हिस्सेदारी विकून कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे. यातच आता दोन इंधन कंपन्यांचे विलिनीकरण करण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावित विलीनीकरणावर पेट्रोलियम मंत्रालय लवकरच कॅबिनेटची मंजुरी घेणार आहे.

मोदी सरकार पेट्रोलियम कंपन्यांच्या विलीनीकरणाची योजना आखत आहे. दोन सरकारी इंधन कंपन्यांच्या विलीनीकरणाच्या प्रस्तावावर पेट्रोलियम मंत्रालय काम करीत आहे. या कंपन्या मंगळुरु रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (MRPL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)च्या आहेत. शेअर बाजारात सूचिबद्ध या दोन्ही कंपन्या ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन (ONGC) च्या उपकंपन्या आहेत. 

विलीनीकरणाची कल्पना ५ वर्षांपूर्वी आली होती

एमआरपीएल आणि एचपीसीएलच्या विलीनीकरणाची कल्पना ५ वर्षांपूर्वी आली होती, जेव्हा ओएनजीसीने एचपीसीएलचे अधिग्रहण केले होते. परंतु त्यावेळी सरकारच्या या प्रस्तावावर काम झालेले नव्हते, मात्र आता सरकार ती योजना पुढे नेत आहे, अशी माहिती याच्याशी संबंधित एका व्यक्तीने दिली. विशेष म्हणजे हा शेअर स्वॅप करार असू शकतो. विलिनीकरणाअंतर्गत HPCL आणि MRPL च्या शेअर होल्डर्सना नवीन शेअर्स जारी करू शकते. यामध्ये रोखीचे व्यवहार होणार नाहीत, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, ओएनजीसी आणि एचपीसीएल या एमआरपीएलमधील प्रवर्तक कंपन्या आहेत. यामध्ये ओएनजीसीचा ७१.६३ टक्के तर एचपीसीएलचा १६.९६ टक्के हिस्सा आहे. तर ११.४२ टक्के सार्वजनिक शेअरहोल्डिंग आहेत. अशा परिस्थितीत हे विलीनीकरण झाल्यास HPCL मधील ONGC ची हिस्सेदारी वाढेल, जी सध्या ५४.९ टक्के आहे. ओएनजीसी समूहाच्या विविध उपकंपन्या एकाच ब्रँड एचपीसीएलअंतर्गत आणणे हा या विलीनीकरण योजनेचा उद्देश आहे. यामुळे कंपनीला काही कर लाभही मिळतील. हिंदुस्थान पेट्रोलियमचे देशभरात मोठे रिटेल नेटवर्क आहे. या विलीनीकरणानंतर कंपनीला एमआरपीएलची मालमत्ताही मिळेल. एमआरपीएलचे कर्नाटकात मोठे नेटवर्क आहे. सेबीचे नियमामुळे हे विलीनीकरण पूर्ण होण्यासाठी आणखी १ वर्ष लागू शकेल. 

 

Web Title: modi government now preparations for the merger of hpcl mrpl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.