नवी दिल्लीः निवृत्तीनंतर पैशांची चिंता सर्वांनाच सतावत असते. घर खर्च कसा चालणार याच विवंचनेत सामान्य माणूस भरडला जात असतो. आपली हीच चिंता मिटवण्यासाठी मोदी सरकार एक खास पेन्शन योजना घेऊन आली आहे. जिथे गुंतवणूक केल्यावर आपला पैसा सुरक्षित होणार आहे. मोदी सरकारनं एक अशी योजना आणली आहे, ज्यात फक्त 1000 रुपये गुंतवल्यास 2 लाख रुपये मिळणार आहेत. तसेच जीवनभर 5000 रुपयांची पेन्शन आपल्याला मिळणार आहे.
- काय आहे ही NPS योजना?
(राष्ट्रीय पेन्शन प्रणाली) एनपीएस ही एक पेन्शन प्रोडक्ट योजना आहे. 2004मध्ये ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली होती. परंतु 2009नंतर ही योजना सामान्य माणसांसाठीही खुली करण्यात आली आहे. 2011मध्ये खासगी कर्मचाऱ्यांनाही या योजनेत गुंतवणूक करण्यास मंजुरी दिली आहे.
- कसा मोजाल NPSतून मिळणारा लाभ?
समजा 25 वर्ष आपण या योजनेत 1000 रुपये गुंतवता आहेत. ज्यावर आपल्याला 8 टक्के व्याज मिळतं. म्हणजेत तुमची एकूण जमा रक्कम 9.49लाखांच्या जवळपास असते. ज्यात आपण 40 टक्के म्हणजे 1.89 लाख रुपये काढू शकता. ऊर्वरित पैसे आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात प्रत्येक महिन्याला मिळू शकतात. अशा प्रकारे आपल्याला दर महिन्याला 5062 रुपये मिळणार आहेत.