Lokmat Money > बिझनेस न्यूज > Pension Scheme: लग्नाळूंनी द्याच पण लग्न झालेल्यांनीही इकडे लक्ष द्या...! बजेटपुर्वी या योजनेत अर्ज करा, महिन्याला ८००० मिळणार

Pension Scheme: लग्नाळूंनी द्याच पण लग्न झालेल्यांनीही इकडे लक्ष द्या...! बजेटपुर्वी या योजनेत अर्ज करा, महिन्याला ८००० मिळणार

pension scheme: प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माध्यमातून सरकार लोकांना ठराविक पेन्शनची हमी देते. या योजनेत गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पेन्शन दिली जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 12:35 PM2023-01-24T12:35:30+5:302023-01-24T12:46:42+5:30

pension scheme: प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माध्यमातून सरकार लोकांना ठराविक पेन्शनची हमी देते. या योजनेत गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पेन्शन दिली जाते.

Modi Government PMVVY Scheme : Not only for married people, but also for married people, pay attention here...! Apply in this scheme before the budget, you will get 8000 per month pension | Pension Scheme: लग्नाळूंनी द्याच पण लग्न झालेल्यांनीही इकडे लक्ष द्या...! बजेटपुर्वी या योजनेत अर्ज करा, महिन्याला ८००० मिळणार

Pension Scheme: लग्नाळूंनी द्याच पण लग्न झालेल्यांनीही इकडे लक्ष द्या...! बजेटपुर्वी या योजनेत अर्ज करा, महिन्याला ८००० मिळणार

जर तुम्ही नोकरी किंवा धंदा करत असाल आणि लग्न झालेले असेल तर तुम्हाला ३१ मार्च पर्यंत महिन्याला ८००० रुपये मिळविण्याची संधी आहे. यासाठी आजच तुम्हाला या सरकारी योजनेत अर्ज करावा लागणार आहे. या योजनेतून तुम्हाला गॅरंटीड दर महिन्याला एक निश्चित अमाऊंट दिली जाईल. 

या योजनेत अर्ज करण्याची अखेरची तारीख ३१ मार्च २०२३ आहे. अशातच तुमच्याकडे आता 30 दिवसच राहिले आहेत. या योजनेचे नाव पंतप्रधान वय वंदन योजना (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana) असे आहे. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुमचे किमान वय 60 वर्षे असावे.

प्रधानमंत्री वय वंदना योजनेच्या माध्यमातून सरकार लोकांना ठराविक पेन्शनची हमी देते. या योजनेत गुंतवणूकदाराला मासिक, त्रैमासिक किंवा वार्षिक पेन्शन दिली जाते. ही योजना केंद्र सरकार आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) द्वारे चालवली जाते. यामुळे जर तुम्ही तरुण असाल, या योजनेत तुमचे वय बसत नसेल तर तुम्ही तुमचे आई वडील, काका-काकू, मामा-मामी यांना या योजनेचा लाभ घेऊन देऊ शकता. तुमच्या आई वडिलांची निवृत्तीनंतरची सोय, आत्मनिर्भर होण्याची सोय करू शकता. 

या योजनेत फक्त 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे लोक अर्ज करू शकतात. या योजनेत तुम्ही 15 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकता. या योजनेत पूर्वी फक्त 7 लाख 50 हजार रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येत होती, मात्र आता सरकारने या योजनेतील गुंतवणुकीची मर्यादा वाढवली आहे. 

या योजनेत गुंतवणूक करून विवाहितांना दर महिन्याला ८ हजार रुपये पेन्शन मिळू शकते. जर पती-पत्नी दोघांनी या योजनेत 6-6 लाख रुपये गुंतवले, तर त्यांना दरमहा एकूण 8 हजार रुपये म्हणजेच दोघांसाठी 4-4 हजार रुपये पेन्शन दिली जाईल. या योजनेअंतर्गत, तुम्हाला वार्षिक 7.40% व्याज देखील दिले जाते. तुम्हाला 10 वर्षांसाठी पेन्शन आणि त्यानंतर तुम्ही गुंतवलेली रक्कम परत दिली जाते. म्हणजे दर महिन्याला व्याजही मिळते आणि तुमचे पैसे तुम्हाला परतही मिळतात. 

Web Title: Modi Government PMVVY Scheme : Not only for married people, but also for married people, pay attention here...! Apply in this scheme before the budget, you will get 8000 per month pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.