Lokmat Money > बिझनेस न्यूज > आता मोदी सरकार सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्सही विकणार; Air India नंतर दुसऱ्या मोठ्या विक्रीला दिली मंजुरी

आता मोदी सरकार सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्सही विकणार; Air India नंतर दुसऱ्या मोठ्या विक्रीला दिली मंजुरी

सायन्स अँड टेक्‍नोलॉजी मिनिस्‍ट्री (Ministry of Science and Technology)अंतर्गत येणाऱ्या सीईएलची (CEL) स्थापना 1974 मध्ये झाली होती. कंपनीने ‘एक्सल काउंटर सिस्टम’देखील (Axle Counter Systems) विकसित केले आहे. याचा उपयोग ट्रेन्सच्या सुरक्षित ऑपरेशनसाठी रेल्वे सिग्नल सिस्टममध्ये केला जातो.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 08:57 AM2021-12-01T08:57:57+5:302021-12-01T08:59:24+5:30

सायन्स अँड टेक्‍नोलॉजी मिनिस्‍ट्री (Ministry of Science and Technology)अंतर्गत येणाऱ्या सीईएलची (CEL) स्थापना 1974 मध्ये झाली होती. कंपनीने ‘एक्सल काउंटर सिस्टम’देखील (Axle Counter Systems) विकसित केले आहे. याचा उपयोग ट्रेन्सच्या सुरक्षित ऑपरेशनसाठी रेल्वे सिग्नल सिस्टममध्ये केला जातो.

Modi Government sells central electronics to nandal finance and leasing for rs 210 crore | आता मोदी सरकार सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्सही विकणार; Air India नंतर दुसऱ्या मोठ्या विक्रीला दिली मंजुरी

आता मोदी सरकार सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्सही विकणार; Air India नंतर दुसऱ्या मोठ्या विक्रीला दिली मंजुरी

नवी दिल्ली - मोदी सरकारने सोमवारी सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. अर्थात सीईएल (Central Electronics Ltd) नंदल फायनान्स अँड लीजिंगला (Nandal Finance and Leasing) 210 कोटी रुपयांत विकण्यास मंजुरी दिली आहे. चालू आर्थिक वर्षातील ही दुसरी स्‍ट्रॅटेजिक डिसइन्‍वेस्‍टमेंट (Strategic Disinvestment) आहे. सरकारने नुकतीच एअर इंडियाच्या (Air India) संचालनाची जबाबदारी टाटाला दिली आहे.

1974 मध्ये झाली होती स्थापना, सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि. -
सायन्स अँड टेक्‍नोलॉजी मिनिस्‍ट्री (Ministry of Science and Technology)अंतर्गत येणाऱ्या सीईएलची (CEL) स्थापना 1974 मध्ये झाली होती. ही कंपनी, सौर फोटोव्होल्टिक (SPV) क्षेत्रात अग्रगण्य असून तीने आपल्या स्वतःच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या (R & D) प्रयत्नांसोबतच टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. कंपनीने ‘एक्सल काउंटर सिस्टम’देखील (Axle Counter Systems) विकसित केले आहे. याचा उपयोग ट्रेन्सच्या सुरक्षित ऑपरेशनसाठी रेल्वे सिग्नल सिस्टममध्ये केला जातो.

दोन कंपन्यांनी लावली होती बोली - 
सरकारने 3 फेब्रुवारी 2020 रोजी लेटर ऑफ इंटेंट (LoI) मागवले होते. यानंतर तीन लेटर ऑफ इंटेंट मिळाले. मात्र, यांपैकी केवळ नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रायव्हेट लिमिटेड आणि जेपीएम इंडस्ट्रीज लि. या दोनच कंपन्यांनी 12 ऑक्टोबर 2021 रोजी आर्थिक बोली सादर केली. गाझियाबादच्या नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रा. लि.ने 210 कोटी रुपयांची बोली लावली, तर जेपीएम इंडस्ट्रीजने 190 कोटी रुपयांची बोली लावली होती.

अधिकृत निवेदनानुसार, “अल्टरनेटिव्ह मॅकेनिझमने भारत सरकारच्या सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लि.मधील 100 टक्के इक्विटी स्टेकच्या विक्रीसाठी. मेसर्स नंदल फायनान्स अँड लीजिंग प्रायव्हेट लि.ची सर्वाधिक बोलीला मंजुरी दिली. यशस्वी ठरलेली बोली 210 कोटी रुपयांची होती.

ही डील चालू आर्थिक वर्ष 2021-22 च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित -
स्‍ट्रॅटजिक डिसइन्‍व्हेस्‍टमेंटवर स्थापन झालेल्या अल्‍टरनेटिव्ह मॅकेनिझममध्ये रस्ते वाहतूकमंत्री नितिन गडकरी, वित्त मंत्री निर्मला सीतारमण आणि विज्ञान थता तंत्रज्ञानमंत्री जितेंद्र सिंह यांचा समावेश आहे. निवेदनानुसार, ही डील चालू आर्थिक वर्ष 2021-22 (एप्रिल-मार्च)च्या अखेर पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.


 

Web Title: Modi Government sells central electronics to nandal finance and leasing for rs 210 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.