नवी दिल्लीः केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॅकेज देण्याच्या तयारीत आहे. सरकार लवकरच याची घोषणाही करणार आहे. CNBC-आवाजच्या माहितीनुसार, मोदी सरकार ऑटो सेक्टरसह 4 सेक्टरना लवकरच दिलासा देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यासाठी पंतप्रधान कार्यालयानं दोन ते तीन बैठकाही घेतल्या आहेत.
या सेक्टर्सना मिळणार पॅकेजः ऑटो सेक्टरशिवाय आणखी चार सेक्टरसाठी मोदी सरकार दिलासादायक पॅकेजची घोषणा करण्याची शक्यता आहे. यात फायनान्शियल सेक्टर, सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग(एमएसएमई, MSME), रिअल इस्टेट (Real Estate), बँक आणि एनबीएफसीचाही समावेश आहे.
परदेशी गुंतवणूकदारांसाठी नियम होणार सोपे- फायनान्शियल मार्केटसाठी सरकार महत्त्वाची पावलं उचलण्याची शक्यता आहे. फॉरन पोर्टपोलियो इन्व्हेस्टर्स (FPIs)ला सरचार्जपासून दिलासा मिळणार आहे. निर्मला सीतारामण यांनी 2 कोटी रुपयांहून अधिक कमाई असलेल्या लोकांवर सरचार्ज वाढवला आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी अटी आणखी सोप्या होणार आहे.
बँक आणि NBFCवर असणार विशेष लक्ष- सरकारचं बँक आणि नॉन बँकिंग फायनान्शियल सर्विसेज(NBFCs)वर विशेष लक्ष असेल. एनबीएफसी सेक्टरही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो आहे. सरकार या सेक्टरसाठी दिलासा पॅकेजची घोषणा करू शकते. तसेच रिअल इस्टेटमधल्या हाऊसिंग सेक्टरसाठीही मोदी सरकार मोठी पावलं उचलण्याच्या तयारीत आहे.
MSME संदर्भात होणार मोठी घोषणाः सूक्ष्म, लघू आणि मध्यम (MSME) उद्योगांसंदर्भात शिथिल अटींद्वारे कर्ज देण्याची व्यवस्था करण्यात येऊ शकते. तसेच सरकार रोजगार देणाऱ्या सेक्टरवरही लक्ष केंद्रित करत आहे. लवकरच दिलासा पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता आहे.
अर्थव्यवस्थेला पुन्हा गती देण्यासाठी मोदी सरकार घेणार 4 मोठे निर्णय
केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी पॅकेज देण्याच्या तयारीत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 06:14 PM2019-08-21T18:14:44+5:302019-08-21T18:15:47+5:30