Lokmat Money > बिझनेस न्यूज > IDBI बँकेसह 3 कंपन्यांची विक्री मार्चपर्यंत पूर्ण होणार! जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

IDBI बँकेसह 3 कंपन्यांची विक्री मार्चपर्यंत पूर्ण होणार! जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

IDBI : सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 04:16 PM2022-06-02T16:16:43+5:302022-06-02T16:17:11+5:30

IDBI : सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे.

modi government's aims to conclude sale of idbi sci and beml by next march know detail | IDBI बँकेसह 3 कंपन्यांची विक्री मार्चपर्यंत पूर्ण होणार! जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

IDBI बँकेसह 3 कंपन्यांची विक्री मार्चपर्यंत पूर्ण होणार! जाणून घ्या सरकारचा काय आहे प्लॅन?

नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रातील आयडीबीआय (IDBI) बँकेसह 3 कंपन्यांची विक्री चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच मार्च 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामध्ये शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बीईएमएल लिमिटेडच्या विक्रीचा समावेश आहे.

अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने बिझनेस टुडे टीव्हीशी संवाद साधताना सांगितले की, आम्हाला कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि हिंदुस्तान जिंक लिमिटेडची निर्गुंतवणूक प्रक्रिया मार्च 2023 पूर्वी सुरू करण्याचा विश्वास आहे. प्रत्यक्षात हिंदुस्थान जिंकमध्ये केंद्राचा 29.58 टक्के हिस्सा विकण्यास मंजुरी देण्यात आली आहे. आर्थिक घडामोडींच्या मंत्रिमंडळ समितीने गेल्या आठवड्यात या विक्रीला मंजुरी दिली, ज्यामुळे सरकारी तिजोरीत 38,000 कोटी रुपयांहून अधिक जमा होण्याची अपेक्षा आहे.

सरकारचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट... 
दरम्यान, या कंपन्यांच्या विक्रीमुळे सरकारला हे लक्ष्य सहज गाठता येणार आहे.गेल्या वर्षी विमा कंपनी एसरकारने चालू आर्थिक वर्षासाठी 65,000 कोटी रुपयांचे निर्गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवले आहे. लआयसीच्या आयपीओला विलंब झाल्यामुळे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट सरकार पूर्ण करू शकले नाही, तर यावर्षी एलआयसीने इश्यू आणि ओएनजीसी ऑफर-फॉर-सेलद्वारे 23,574 कोटी रुपये उभे केले आहेत.

BPCL ची निर्गुंतवणूक प्रक्रिया थांबवली 
अलीकडेच, सरकारने भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची (BPCL) निर्गुंतवणूक प्रक्रिया थांबवली आहे. दरम्यान, एका खरेदीदारामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला. वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड विक्री प्रक्रियेवर वेगवेगळ्या अटींसह पुनर्विचार केला जाईल. मात्र, हे किती काळ टिकेल हे सांगणे कठीण आहे.

Web Title: modi government's aims to conclude sale of idbi sci and beml by next march know detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.