नवी दिल्लीः केंद्रातील मोदी सरकारनं पोस्टाच्या योजनांवरचा व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पोस्ट ऑफिसच्या योजनांमध्ये गुंतवलेल्या पैशांतील व्याजदरात मोदी सरकारनं 0.10 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यामुळेच आपल्याला जास्त नफा मिळणार आहे. सरकार छोट्या बचत योजनांसाठी प्रत्येक तिमाहीत व्याजदर निश्चित करते. विशेष म्हणजे पोस्टात तुम्ही छोटी छोटी रक्कमही गुंतवू शकता आणि त्यावर व्याजाच्या स्वरूपात मोठी रक्कम कमावू शकता. सरकारी योजना असलेल्या पीपीएफचेही अनेक फायदे आहे.
पोस्टाची मुदत ठेव- पोस्टात तुम्ही चार प्रकारे ठेवी ठेवू शकता. एक वर्ष, दोन वर्षं, तीन वर्षं आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. एक वर्षातील मुदत ठेवीवर 6.6 टक्के व्याज मिळतं, तर दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर 6.7 टक्के व्याज मिळतं. तीन वर्षीय पोस्टाच्या ठेवींवर 6.9 टक्के व्याज दिलं जातं. तर पाच वर्षांसाठी ठेवलेल्या रकमेवर 7.4 टक्के व्याज मिळतं. याच गुंतवणुकीवर आपल्याला नव्या व्याजदरानुसार फायदा मिळणार आहे. विशेष म्हणजे पाच वर्षांसाठी ठेवलेल्या ठेवींवर प्राप्तिकर कायदा 80 सीअंतर्गत सूटही दिली जाते. त्यामुळे या पैशांवर कोणताही कर लागत नाही.
15 वर्षीय सार्वजनिक भविष्य निधी खातं(पीपीएफ)- पीपीएफचं खातं तुम्हाला 100 रुपयांमध्ये उघडता येते. यात आर्थिक वर्षामध्ये एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर लाभ मिळतो. यातील जमा रकमेवर 8 टक्के व्याज दिलं जातं. खातेधारकांना आपल्या खात्यात 500 रुपये आणि जास्त करून 1.50 लाख रुपये जमा करावे लागतात. तसेच खात्याची मर्यादा 15 वर्षांसाठी आहे. यात तुम्ही संयुक्त अकाऊंटही उघडू शकता. तुम्हाला या योजनेत नॉमिनेशनची सुविधाही मिळते. यात एका वित्त वर्षात तुम्हाला एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर चांगला फायदा मिळतो.
वरिष्ठ नागरिक बचत खाते(एससीएसएस): 60 वर्षं वयाची व्यक्तीही या योजनेत खातं उघडू शकते. 55 ते 60 वर्षं वयाच्या व्यक्ती निवृत्तीच्या तीन महिने आधीही या योजनेत खातं खोलून पैसे गुंतवू शकतात. खातं उघडल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 1000 रुपये जमा ठेवावे लागतात. या खात्यात तुम्ही जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमवू शकता. ज्यावर तुम्हाला वर्षाला 8.7 टक्के व्याज मिळते. या योजनेची मर्यादा पाच वर्षांची असते. डिसेंबर 2018च्या तिमाहीत वरिष्ठ नागरिक बचत योजनेत तुम्हाला प्रतिवर्ष 8.7 टक्के व्याज मिळते. वरिष्ठ नागरिक बचत योजनेवर व्याज 31 मार्च/30 सप्टेंबर/ 31 डिसेंबरला जमा करण्याच्या तारखेपासून लागू आहे. त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबरपर्यंत जमा रकमेवर व्याज मिळणार आहे. डिसेंबरमध्ये समाप्त होणा-या तिमाहीसाठी पीपीएफमध्ये जमा असलेल्या रकमेवर प्रतिवर्षी 8 टक्के व्याज मिळत होते. आता त्यात 0.10 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरवर्षी 6000 रुपयांची बचत केल्यास 15 वर्षांनी मुदत संपल्यावर 1.7 लाख रुपये तुम्हाला मिळू शकतात. खात्रीशीर व्याज देणारा आणि सुरक्षित पर्याय तसेच तरुण मुला-मुलींनी बचत सुरू करण्यास प्रारंभीच्या टप्प्यात पीपीएफचा पर्यायाचा विचार केला पाहिजे. जितक्या लवकर बचत सुरू करता येईल तितके चांगले फायदे आपल्याला मिळतात.
#BreakingNews l पोस्ट ऑफिस जमा दरों में 0.10% की बढ़ोतरी, 1 साल के जमा दर पर 0.10% की बढ़त हुई l pic.twitter.com/bHRqtA60Ml
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) January 1, 2019
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट(एनएससी): नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत डिसेंबरला संपणा-या तिमाहीसाठी 8.0 टक्क्यांनी व्याज मिळते. या योजनेंतर्गत तुम्ही 100 रुपये गुंतवू शकता. पहिल्यांदा या योजनेत गुंतवणूक करणा-याला वर्षाला 7.6 टक्के व्याज मिळत होते. जर तुम्ही नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये 100 रुपयांची गुंतवणूक केल्यास पाच वर्षांनी तुम्हाला 146.93 रुपये व्याजाच्या स्वरूपात मिळतात.