Lokmat Money > बिझनेस न्यूज > मोबाइल उद्योगाला चालना देण्यासाठी मोदी सरकारची नवी योजना

मोबाइल उद्योगाला चालना देण्यासाठी मोदी सरकारची नवी योजना

या योजनेद्वारे भारतात बनविलेल्या उत्पादनांच्या वाढीव विक्रीवर पाच वर्षांसाठी ४ ते ६ टक्के लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2020 05:00 AM2020-03-05T05:00:50+5:302020-03-05T05:00:54+5:30

या योजनेद्वारे भारतात बनविलेल्या उत्पादनांच्या वाढीव विक्रीवर पाच वर्षांसाठी ४ ते ६ टक्के लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे.

 Modi government's new plan to boost the mobile industry | मोबाइल उद्योगाला चालना देण्यासाठी मोदी सरकारची नवी योजना

मोबाइल उद्योगाला चालना देण्यासाठी मोदी सरकारची नवी योजना

नवी दिल्ली : मोबाइल फोन व त्यांच्या सुट्या भागांची निर्मिती करणाऱ्या उद्योगांना चालना देण्यासाठी सरकारने ‘मेक इन इंडिया’अंतर्गत ४२ हजार कोटी रुपयांची उत्पादन-आधारित प्रोत्साहन योजना आखली आहे. या योजनेद्वारे भारतात बनविलेल्या उत्पादनांच्या वाढीव विक्रीवर पाच वर्षांसाठी ४ ते ६ टक्के लाभ देण्याचा सरकारचा विचार आहे.
वित्त व वाणिज्य ही मंत्रालये, तसेच निती आयोगाशी सल्लामसलत करून ही योजना आखली आहे. भारताला इलेक्ट्रॉनिक्स व सुट्या भागांचे उत्पादन केंद्र बनविण्यासाठी ही योजना आखली आहे. मोठे उत्पादन करार असलेल्या कंपन्यांच्या १४ हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या मोबाइलवर प्रोत्साहन लाभ देण्याचा विचार आहे. कार्बन, लावा, कार्बन, इंटेक्स व मायक्रोमॅक्स आदी कंपन्यांना या योजनेचा सर्वाधिक लाभ मिळू शकेल.

Web Title:  Modi government's new plan to boost the mobile industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.