Lokmat Money > बिझनेस न्यूज > पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मोदी सरकारने तेल कंपन्यांना दिला मोठा दिलासा

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मोदी सरकारने तेल कंपन्यांना दिला मोठा दिलासा

गेल्या काही दिवसापासून देशात इंधनाच्या किमतीत बदल झालेला नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर पुन्हा कमी झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:30 PM2022-12-16T13:30:13+5:302022-12-16T13:33:26+5:30

गेल्या काही दिवसापासून देशात इंधनाच्या किमतीत बदल झालेला नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर पुन्हा कमी झाले आहेत.

modi govt slashes windfall tax on domestic crude oil atf | पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मोदी सरकारने तेल कंपन्यांना दिला मोठा दिलासा

पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार? मोदी सरकारने तेल कंपन्यांना दिला मोठा दिलासा

गेल्या काही दिवसापासून देशात इंधनाच्या किमतीत बदल झालेला नाही. रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. आता जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर पुन्हा कमी झाले आहेत. यासोबतच आता केंद्र सरकारने तेल कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएलवरील विंडफॉल टॅक्स सरकारने कमी केला आहे. देशांतर्गत कंपन्यांद्वारे उत्पादित कच्च्या तेलावरील कर 1700 रुपये प्रति टन करण्यात आला आहे. सध्या तो 4900 रुपये प्रतिटन होता.

याशिवाय एटीएफवरील विंडफॉल टॅक्स 5 रुपये प्रति लीटरवरून 1.5 रुपये प्रति लिटर करण्यात आला आहे. सरकारने पेट्रोलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोलवर शून्य विंडफॉल कर लागू आहे, तो कायम ठेवण्यात आला आहे. हायस्पीड डिझेलवरील विंडफॉल टॅक्स 8 रुपयांवरून 5 रुपये करण्यात आला आहे.

यापूर्वी 1 जुलै रोजी पेट्रोल-एटीएफवर 6 रुपये आणि डिझेलवर 13 रुपये प्रति लिटर निर्यात शुल्क लावण्यात आले होते. यासोबतच कच्च्या तेलाच्या देशांतर्गत उत्पादनावर प्रतिटन 2323250 रुपये विंडफॉल टॅक्स लावण्यात आला आहे.

जोर का झटका! SBI कडून Home Loan च्या व्याजदरात वाढ, आता भरावा लागेल इतका EMI 

विंडफॉल टॅक्स विशिष्ट परिस्थितीत लादला जातो. जेव्हा एखाद्या कंपनीला किंवा उद्योगाला खूप फायदा होतो तेव्हा हे त्या परिस्थितीत जाते. 

विशिष्ट अतिरिक्त उत्पादन शुल्काशिवाय लागू केलेल्या विंडफॉल कराचा उद्देश देशांतर्गत तेल उत्पादकांनी मिळवलेला नफा शोषून घेणे आहे. सरकार दर 15 दिवसांनी त्याचा आढावा घेते.

Web Title: modi govt slashes windfall tax on domestic crude oil atf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.