Lokmat Money > बिझनेस न्यूज > तेल आयातीवर मोदी यांनी घेतली बैठक

तेल आयातीवर मोदी यांनी घेतली बैठक

तेल आणि गॅसची आयात कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर उपाय विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बैठक घेतली.

By admin | Published: November 3, 2016 06:02 AM2016-11-03T06:02:19+5:302016-11-03T06:02:19+5:30

तेल आणि गॅसची आयात कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर उपाय विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बैठक घेतली.

Modi held a meeting on oil imports | तेल आयातीवर मोदी यांनी घेतली बैठक

तेल आयातीवर मोदी यांनी घेतली बैठक


नवी दिल्ली : तेल आणि गॅसची आयात कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येऊ शकतात, यावर उपाय विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी बैठक घेतली.
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने या मुद्द्यावर सादरीकरण केले. मंत्रालयाने अनेक उपाय त्यात सुचविले. देशातील कच्च्या तेलाचे, तसेच गॅसचे उत्पादन वाढविणे, जैव इंधन आणि अक्षय ऊर्जा यांना प्रोत्साहन देणे, या उपायांचा त्यात समावेश आहे. ऊर्जा दक्षता वाढविणे आणि संरक्षण उपायांवर लक्ष देणे, असे काही उपायही सादरीकरणात सुचविण्यात आले.
या बैठकीला गृहमंत्री राजनाथ सिंग, पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर उपस्थित होते. याशिवाय नीति आयोगाचे उपाध्यक्ष आणि सीईओ, कॅबिनेट सचिव, तसेच पंतप्रधान कार्यालय, पेट्रोलियम मंत्रालय, विदेश मंत्रालय, गृहमंत्रालय, वित्त मंत्रालय व संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारीही बैठकीला उपस्थित होते. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Modi held a meeting on oil imports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.