Join us

परदेशी गुंतवणूकदारांवरही मोदींची जादू

By admin | Published: May 19, 2014 3:18 PM

नरेंद्र मोदींमुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भारताकडे आकर्षित होत असून मोदींना उमेदवारी जाहीर झाल्यापासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात तब्बल एक लाख कोटी रुपये गुंतवले आहेत.

ऑनलाइन टीम
नवी दिल्ली, दि. १९ - नरेंद्र मोदींमुळे परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात भारताकडे आकर्षित होत असून मोदींना उमेदवारी जाहीर झाल्यापासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात तब्बल एक लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. यातील ८८ हजार ७७२ कोटी आणि शेअर बाजारात तर १३ हजार ३९९ कोटी हे भांडवली बाजारात गुंतवले आहेत. 
लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना बहुमत मिळाल्यावर शेअर बाजार चांगलाच वधारला आहे. तर मोदींना उमेदवारी जाहीर झाल्यापासून परदेशी गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत असल्याचे सेबीकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. गेल्यावर्षी १३ सप्टेंबररोजी भाजपने मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले होते. सेबीकडून मिळालेल्या माहितीनुसार १३ सप्टेंबरपासून परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात तब्बल एक लाख कोटी रुपये गुंतवले आहेत. सध्या देशात १,७०० नोंदणीकृत परदेशी गुंतवणूकदार आहेत. मोदींनी लोकसभेत २७२ ची मॅजिक फिगर गाठल्याने परदेशी गुंतवणूकदारांचे प्रमाण आणखी वाढेल असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.