Join us

सोमवारी मनपाची विशेष सभा उपायुक्त चिंचोलीकरांची विशेष सभा होणार रद्द

By admin | Published: February 14, 2015 11:52 PM

अकोला : आकस्मिक पाणीपुरवठा योजना व सुजल निर्मल अभियानच्या मुद्यावर १६ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात सकाळी ११.३० वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्याविरुद्ध निलंबनाचा ठराव घेण्यासाठी २ डिसेंबर रोजी आयोजित केलेली स्थगित विशेष सर्वसाधारण सभा रद्द करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपच्यावतीने घेण्यात आला. चिंचोलीकरांच्या मुद्यावर भाजपने यू टर्न घेतल्याने सत्तापक्षात एकवाक्यता नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे.

मनपाच्या विशेष सर्वसाधारण सभेत आकस्मिक पाणीपुरवठा योजना, पम्पिंग मशीनच्या खरेदीसाठी दहा टक्के लोकवर्गणी जमा करणे तसेच योजनेच्या देखभाल दुरुस्तीवर चर्चा केली जाईल. शासनाच्या सुजल निर्मल अभियान अंतर्गत सहभाग घेण्याच्या करारनाम्यावर चर्चा करण्यासह नागरी घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी प्रकल्पावर चर्चा करून निर्णय घेतल्या जाईल. दुकानांचे नामफलक काढण्याच्या मुद्यावर सत्ताधारी भाजपातील नगरसेवकांसोबत झालेल्या वादंगामुळे उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांच्या विरोधात निलंबनाचा ठराव घेण्यासाठी २ डिसेंबर रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. ही सभा सुरू होण्यापूर्वीच महापौर उज्ज्वला देशमुख यांनी स्थगित केली. स्थगित सभा थेट रद्द करण्याचा निर्णय भाजपच्यावतीने घेण्यात आल्याने विरोधी पक्षनेता साजीद खान यांनी भाजपच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.