Join us

75 दिवसांत पैसा डबल, सोनं विकणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये 17% ची तेजी; गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 6:06 PM

याच वर्षाच्या जुलै महिन्यात सेन्को गोल्डचा IPO आला होता...

गेल्या काही दिवासांमध्ये शेअर बाजारात कंपन्यांच्या आयपीओने लिस्टिंगनंतर जबरदस्त कामगिरी केली आहे. त्यांपैकीच एक म्हणजे, सेन्को गोल्ड आयपीओ. कंपनीच्या शेअरच्या किमतीत आज 17 टक्क्यांची वाढ झाली आहे. यानंतर कंपनीच्या शेअर्सने बीएसईवर 600 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. याच वर्षाच्या जुलै महिन्यात सेन्को गोल्डचा IPO आला होता.

आज 17 टक्क्यांची उसळी -बीएसईवर सेन्को गोल्डचा शेअर 533 रुपयांवर खुला झाला होता. यानंतर बघता बघता हा शेअर 17 टक्क्यांच्या तेजीसह 626.40 रुपयांवर पोहोचला होता. हा कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. यापूर्वी मंगळवारी सेन्को गोल्डचा शेअर 532.35 रुपयांच्या लेव्हलवर बंद झाला होता. 

अशी होती आयपीओची किंमत -  सेन्को गोल्डचा आयपीओ 4 जुलै रोजी खुला झाला होता. गुंतवणूकदारांना 6 जुलै 2023 पर्यंत सबस्क्राईब करण्याची संधी होती. कंपनीने सेन्को गोल्ड आयपीओचा प्राईज बँड 301 रुपये ते 317 रुपये प्रति शेअर निश्चित केली होता. सेन्को गोल्ड आयपीओची लॉट साइज 47 शेअर्सची होती. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना किमान 14,899 रुपयांची गुंतवणूक करावी लागली.

BSE मध्ये कंपनीची लिस्टिंग 35.96 टक्के प्रीमियमवर म्हणजेच 431 रुपयांवर झाली होती. तसेच, एनएसईवर कंपनीची लिस्टिंग 430 रुपये प्रति शेअरने झाली होती.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारसोनंगुंतवणूक