Join us

सिंभवली शुगर्सविरुद्ध मनी लाँड्रिंगचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2018 3:10 AM

देशातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादकांमध्ये असलेल्या सिंभवली शुगर्स या कंपनीविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे.

नवी दिल्ली : देशातील सर्वांत मोठ्या साखर उत्पादकांमध्ये असलेल्या सिंभवली शुगर्स या कंपनीविरुद्ध सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविला आहे. ९७.८५ कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केल्याचा कंपनीवर आरोप आहे. सिंभवली शुगर्स कंपनीच्या हापूड आणि नोयडा येथील ठिकाणांवर ईडीने छापेही मारले आहेत. यात काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. विविध बँकांतून कंपनीचा तसेच कंपनीच्या अधिकाºयांचा वित्तीय तपशीलही ईडीने गोळा केला आहे.या कंपनीविरुद्ध सीबीआयने आधीच एफआयआर दाखल केला आहे. त्याआधारे आता ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याखाली फौजदारी गुन्हा नोंदविला आहे. बँकांकडून कर्जाच्या स्वरूपात घेण्यात आलेला निधी अन्यत्र वळविल्याचे आढळून आल्यास आरोपींविरुद्ध योग्य कलमांखाली कारवाई करण्यात येईल.सीबीआयने सिंभवली शुगर्स लिमिटेड ही कंपनी तसेच कंपनीचे चेअरमन गुरमित सिंग मान, उप व्यवस्थाकीय संचालक गुरपालसिंग आणि इतरांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एस. सी राव, मुख्य वित्त अधिकारी संजय टापरिया, कार्यकारी संचालक गुरसिमरण कौर मान आणि पाच अ-कार्यकारी संचालक यांच्याविरुद्धही सीबीआयने गुन्हा नोंदविला आहे.