Lokmat Money > बिझनेस न्यूज > Business Idea : उन्हाळ्यात 'हा' व्यवसाय राहील खूप फायदेशीर, दरमहा मिळतील 30 हजार रुपये 

Business Idea : उन्हाळ्यात 'हा' व्यवसाय राहील खूप फायदेशीर, दरमहा मिळतील 30 हजार रुपये 

Business Idea : जर तुम्ही उन्हाळ्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक उत्तम व्यवसाय करण्याची संधी आहे. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 09:56 AM2023-03-27T09:56:37+5:302023-03-27T09:57:16+5:30

Business Idea : जर तुम्ही उन्हाळ्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक उत्तम व्यवसाय करण्याची संधी आहे. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. 

money making tips business idea this business will be very profitable in summer you can earn 30 thousand per month | Business Idea : उन्हाळ्यात 'हा' व्यवसाय राहील खूप फायदेशीर, दरमहा मिळतील 30 हजार रुपये 

Business Idea : उन्हाळ्यात 'हा' व्यवसाय राहील खूप फायदेशीर, दरमहा मिळतील 30 हजार रुपये 

नवी दिल्ली : सर्वत्र आता उन्हाळा सुरु झाला आहे. कडक उन्हामुळे तापमानही वाढू लागले आहे. उन्हाळा सुरु झाला की, शरीराची लाहीलाही होते. शरीराला गारवा मिळावा यासाठी आपण थंड पदार्थ किंवा थंड पेयाचे सेवन करतो. यामुळेच आता थंड पदार्थांची मागणी सुद्धा वाढली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही उन्हाळ्यात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला एक उत्तम व्यवसाय करण्याची संधी आहे. हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगला नफा मिळवू शकता. 

दरम्यान, आम्ही आईस क्यूबच्या (Ice Cube) व्यवसायाबद्दल बोलत आहोत. जवळपास सर्वच ठिकाणी आइस क्यूबचा वापर केला जातोय. घरापासून तर ज्यूच्या दुकानापर्यंत आणि लग्नापासून ते बारपर्यंत आईस क्यूबची गरज पडते. येणाऱ्या भीषण उन्हाळ्यात याची मागणी वाढणार आहे. अशा वेळी हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतो. त्यामुळे आईस क्यूबचा व्यवसाय सुरु करुन तुम्ही या सीझनमध्ये चांगला नफा कमावू शकता.

कसा सुरु करावा व्यवसाय?
आईस क्यूबचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या व्यवसायाला जवळच्या प्रशासकिय कार्यालयात रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच, हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुम्हाला एका फ्रीझरची गरज भासणार आहे. दुसरी गरज म्हणजे शुद्ध पाणी आणि वीज लागेल. तुम्ही हा फ्रिझर कोणत्याही ठिकाणी ठेवू शकता. या फ्रीझरमध्ये विविध आकारचे आईस क्यूब तुम्ही तयार करु शकता. ज्यामुळे तुमच्या आईस क्यूबची बाजारात मागणी वाढेल.

आईस क्यूबच्या मशीनचा खर्च
हा व्यवसाय सुरु करण्यासाठी तुमच्याजवळ कमीत कमी 1 लाख रुपये पाहिजेत. आईस क्यूब बनवण्यासाठी लागणाऱ्या फ्रीझरची किंमत 50,000 रुपयांपासून सुरु होते. म्हणजेच तुमच्याजवळ किमान अमाउंट असणे गरजेचे आहे.

दरमहा किती होईल नफा? 
या व्यवसायात तुम्हाला दरमहा 20,000 ते 30,000 चा नफा सहज मिळू शकतो. तसेच, हंगामानुसार वाढत्या मागणीमुळे, आपण या व्यवसायातून दरमहा 50,000 ते 60,000 रुपये कमवू शकता.

Web Title: money making tips business idea this business will be very profitable in summer you can earn 30 thousand per month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.