Lokmat Money > बिझनेस न्यूज > PPF खातेधारकांना मिळणार 'गुड न्यूज'! या आठवड्यात व्याजदर वाढण्याची शक्यता

PPF खातेधारकांना मिळणार 'गुड न्यूज'! या आठवड्यात व्याजदर वाढण्याची शक्यता

PPF : पीपीएफ ठेवींवर सध्याचा व्याज दर 7.1 टक्के आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 02:50 PM2022-12-27T14:50:34+5:302022-12-27T14:51:27+5:30

PPF : पीपीएफ ठेवींवर सध्याचा व्याज दर 7.1 टक्के आहे.

money making tips ppf interest rate 2023 public provident fund interest rate revised till 31 dec 2022 | PPF खातेधारकांना मिळणार 'गुड न्यूज'! या आठवड्यात व्याजदर वाढण्याची शक्यता

PPF खातेधारकांना मिळणार 'गुड न्यूज'! या आठवड्यात व्याजदर वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांना व्याजदरात वाढीचा लाभ मिळू शकतो, कारण 31 डिसेंबरपूर्वी पीपीएफ खात्यावरील व्याजदरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 31 डिसेंबरपर्यंत या दरात कोणताही बदल न झाल्यास, नवीन वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत केलेल्या पीपीएफ ठेवींवर हाच दर लागू होईल. पीपीएफ ठेवींवर सध्याचा व्याज दर 7.1 टक्के आहे.

दरम्यान, भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या वाढीदरम्यान पीपीएफ खातेधारकांना पीपीएफमध्ये मिळणाऱ्या व्याजदरांमध्ये सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. आता अनेक बँका पीपीएफच्या तुलनेत मुदत ठेव योजनांवर अधिक व्याज देऊ करत आहेत. केंद्र सरकार पीपीएफच्या व्याज दरात तिमाही आधारावर सुधारणा करते. पीपीएफ व्याजदरातील पुढील सुधारणा डिसेंबर 2022 च्या अखेरीस होईल, त्यामुळे 2023 च्या पहिल्या तिमाहीत (जानेवारी-मार्च) लागू होणारा पीपीएफ व्याज दर 31 डिसेंबर 2022 पर्यंत असणार आहे.

या वर्षी मे महिन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात सातत्याने वाढ केल्यामुळे बँकेकडून मिळणारे कर्ज महाग झाले आहे, तसेच बचत योजनेवरील व्याजही बेंचमार्क रेटच्या खाली वाढले आहे. असे असूनही पीपीएफसह अनेक सरकारी बचत योजनांवर मिळणारे व्याज वाढलेले नाही. सप्टेंबर 2018 मध्ये पीपीएफवर 7.4 टक्के व्याजदर होता. जून 2019 मध्ये ते 8 टक्क्यांपर्यंत वाढले परंतु तेव्हापासून घसरण सुरू झाली आणि आता पीपीएफवर सध्याचा व्याज दर 7.1 टक्के आहे. 01.04.2012 ते 31.03.2013 दरम्यान पीपीएफ व्याजदर 8.8 टक्के होता आणि गुंतवणूक मर्यादा 1 लाख रुपये/वर्ष होती.

बँक एफडीवरील व्याज तेजीत वाढले
भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केल्यामुळे बँकांनी विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. आता सरकारी आणि खाजगी बँकांमध्ये एफडीवर मिळणारे व्याज जवळपास ८ टक्क्यांवर गेले आहे. तसेच, काही बँका आणि वित्तीय संस्था ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर 9 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत.
 

Web Title: money making tips ppf interest rate 2023 public provident fund interest rate revised till 31 dec 2022

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.