Lokmat Money > बिझनेस न्यूज > SBI ची 'ही' योजना देतेय सर्वोत्तम व्याज; एकदा गुंतवणूक केल्यास दर महिन्याला घरी बसून होईल कमाई!

SBI ची 'ही' योजना देतेय सर्वोत्तम व्याज; एकदा गुंतवणूक केल्यास दर महिन्याला घरी बसून होईल कमाई!

एसबीआयची वार्षिकी ठेव योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2023 03:17 PM2023-05-07T15:17:16+5:302023-05-07T15:18:21+5:30

एसबीआयची वार्षिकी ठेव योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.

money making tips sbi annuity deposit scheme you can earn monthly fixed income by investing in this scheme | SBI ची 'ही' योजना देतेय सर्वोत्तम व्याज; एकदा गुंतवणूक केल्यास दर महिन्याला घरी बसून होईल कमाई!

SBI ची 'ही' योजना देतेय सर्वोत्तम व्याज; एकदा गुंतवणूक केल्यास दर महिन्याला घरी बसून होईल कमाई!

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सर्वात विश्वासार्ह बँक समजली जाते. बहुतेक लोक बँकेच्या विविध योजनांमध्ये आपली बचत गुंतवतात. सुरक्षित गुंतवणूक आणि हमी परताव्यासाठी या योजना अधिक चांगल्या असल्याचे म्हटले जाते. जर तुम्ही अशी योजना शोधत असाल ज्यामध्ये एकदा गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला नियमित निश्चित उत्पन्न मिळेल, तर एसबीआयची वार्षिकी ठेव योजना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकते.

दरम्यान, एसबीआयच्या या योजनेत तुम्हाला एकरकमी पैसे जमा करावे लागतील. त्यानंतर दरमहा व्याजासह कमाईची हमी असते. एसबीआयच्या एन्यूटी डिपॉझिट योजनेमध्ये ग्राहकाला दरमहा मूळ रकमेसोबत (प्रिंसिपल अमाउंट) व्याज दिले जाते. खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज चक्रवाढीचे कॅलक्युलेशन दर तिमाहीत केली जाते.

एसबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, तुम्हाला एन्यूटी डिपॉझिट योजनेंतर्गत जमा केलेल्या रकमेवर बचत खात्यापेक्षा जास्त व्याज दिले जाते. दरम्यान, या योजनेत ठेवीवर तेच व्याज मिळते, जे बँकेच्या मुदत ठेवीवर म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिटवर मिळते. या योजनेत जास्तीत जास्त ठेवींवर मर्यादा नाही. तसेच, मासिक वार्षिकीनुसार किमान ठेव किमान 1000 रुपये करावी लागेल. यामध्ये तुम्हाला बँकेकडून युनिव्हर्सल पासबुकही जारी केले जाईल. या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी गुंतवणूक करता येते.

ओव्हरड्राफ्टची सुविधा
या योजनेत एन्यूटीचे देय डिपॉझिट झाल्यानंतर पुढील निर्धारित तारखेपासून केले जाईल. ती तारीख कोणत्याही महिन्यात नसल्यास, पुढील महिन्याच्या तारखेला एन्यूटी प्राप्त होईल. टीडीएस कापल्यानंतर आणि लिंक केलेल्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केल्यानंतर एन्यूटी दिली जाईल. एसबीआयची ही योजना आपत्कालीन परिस्थितीतही तुमच्या गरजांची पूर्ण काळजी घेऊन तयार करण्यात आली आहे. आवश्यक असल्यास, तुम्ही एन्यूटीच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्क्यांपर्यंत ओव्हरड्राफ्ट करू शकता.

योजनेत कशी करू शकता गुंतवणूक?
एसबीआयच्या एन्यूटी डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही कोणत्याही जवळच्या शाखेत जाऊन नोंदणी करू शकता. ही योजना एसबीआयच्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. योजनेचे खाते बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेतही ट्रान्सफर केले जाऊ शकते. यामध्ये वैयक्तिक नामांकन सुविधा उपलब्ध आहे. हे खाते सिंगल किंवा ज्वाइंट असू शकते. ठेवीदाराचा मृत्यू झाल्यास ही योजना मुदतीपूर्वी बंद केली जाऊ शकते.

Web Title: money making tips sbi annuity deposit scheme you can earn monthly fixed income by investing in this scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.