Join us

हात चालतात तसा पैसा फिरतो, भारताचा विकासदर जगात सर्वाधिक ७.८ टक्के, कष्टकऱ्यांसह शेतकऱ्यांचे मोठे योगदान 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2023 11:29 AM

आरबीआयने व्यक्त केलेल्या ८ टक्के इतक्या अंदाजापेक्षा हा कमी आहे.

नवी दिल्ली : भारताने पुन्हा एकदा जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून आपली ओळख ठळक केली आहे. वित्त वर्ष २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-जून या कालावधीत भारताचा आर्थिक विकास दर ७.८ टक्के राहिला आहे. हा वेग जगभरातील सर्व देशांमध्ये अधिक आहे. आरबीआयने व्यक्त केलेल्या ८ टक्के इतक्या अंदाजापेक्षा हा कमी आहे. देशातील  औद्योगिक उत्पादन, हॉटेल तसेच पर्यटन उद्योग  तसेच शेतीत राबणाऱ्या हातांना अर्थचक्राची गती कायम राखली आहे.  खाण उद्योग आणि रिअल इस्टेटमधील चलती अर्थव्यवस्थेसाठी तारक ठरली.  भारतातील कृषी विकासदर ३.५ टक्के इतका राहिला. भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी वाढण्यात कृषीचे योगदान मोलाचे आहे. मागच्या वर्षी जूनच्या तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा दर म्हणजेच जीडीपी १३.५ टक्के इतका होता. या वर्षातही वाढीचा वेग कायम राखण्यात मोठे यश मिळाले आहे.

वित्तीय तूट वाढलीदेशातील वित्तीय तूट एप्रिल ते जुलै या कालखंडादरम्यान वाढून ६.०६ लाख कोटी इतकी  आहे.मागील वर्षी याच कालखंडात देशाती वित्तीय तूट ४.५१ लाख कोटी इतकी होती. वित्तीय तूट देशाच्या जीडीपीच्या ५.९ टक्के इतके राखण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे.

६.७%वृद्धी दराचा अंदाज : मूडीजमानक संस्था ‘मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस’ने मजबूत आर्थिक गतीच्या पार्श्वभूमीवर कॅलेंडर वर्ष २०२३ साठी भारताचा वृद्धी दर अंदाज शुक्रवारी वाढवून ६.७ टक्के केला. मूडीज’ने आपल्या ‘ग्लोबल मॅक्रो आउटलुक’मध्ये म्हटले आहे की, मजबूत सेवा विस्तार आणि भांडवली खर्च यामुळे दुसऱ्या  (एप्रिल-जून) तिमाहीत आदल्या वर्षाच्या तुलनेत भारताचा वृद्धी दर ७.८ टक्के राहिला. त्यामुळे आम्ही कॅलेंडर वर्ष २०२३ मध्ये भारताचा वृद्धी दर अंदाज ५.५ टक्क्यांवरून वाढवून ६.७ टक्के केला आहे. 

गुंतवणूकदारांना २.८४ लाख कोटींचा फायदामुंबई : सप्टेंबरच्या पहिल्यात दिवशी देशांतर्गत शेअर बाजारात खरेदीचा जोर दिसून आला. दिवसभर व्यवहारात शेअर बाजारात एक टक्क्यांची तेजी दिसली. तेजीमुळे गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. तेजीमुळे शेअर बाजाराचे बाजार भांडवल ३१२.४३ लाख कोटींवर पोहचले. गुरुवारी, हेच बाजार भांडवल ३०९.५९ लाख कोटी रुपये इतके होते. दिवसभरातील व्यवहाराच्याअंती २.८४ लाख कोटींची वाढ झाल्याचे दिसून आले. 

टॅग्स :व्यवसायअर्थव्यवस्था