Join us  

Money: एक चुकीचं उत्तर आणि या कंपनीचे बुडाले १०० अब्ज डॉलर, नेमका काय प्रकार, जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 2:50 PM

Money :

हिंडेनबर्गचा रिपोर्ट समोर आल्यानंतर गौतम अदानी यांच्या कंपनीच्या शेअरमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरण झाली होती. गेल्या काही दिवसांत अदानींच्या कंपनीचे अब्जावधी रुपये शेअर बाजारात बुडाले. दरम्यान, आता एआय चॅटबॉट बार्डच्या जाहिरातीमध्ये चुकीचं उत्तर दिल्यानंतर गुगलला १०० अब्ज डॉलरहून अधिकचे नुकसान झाले आहे. गुगलच्या नव्या चॅटबॉटने एका प्रमोशनल व्हिडीओमध्ये चुकीचं उत्तर दिलं होतं. तज्ज्ञांच्या मते अल्फाबेटच्या गुंतवणूकदारांना गुगलचा चॅटबॉट मायक्रोसॉफ्टच्या चॅटबॉटचा कसा काय सामना करेल? असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे अल्फाबेटच्या शेअरमध्ये ९ टक्क्यांपर्यंतची घसरण झाली आहे.

रॉयटर्सकडून सर्वप्रथम गुगलच्या जाहीरातीमध्ये असलेल्या या त्रुटीकडे लक्ष वेधण्यात आले होते. दरम्यान, गुगलने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यादरम्यान, गुगलने बार्ड नावाचे नवे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉटचे प्रमोशन केले. यादरम्यान, गुगल मॅप्स आणि गुगल लेन्सनसह गुगलच्या विविध प्रॉडक्टमध्ये करण्यात आलेले अपडेट्स दाखवण्यात आले. त्यापूर्वी एकदिवस आधी मायक्रोसॉफ्टने आपले सर्ज इंजिन असलेल्या Bing मध्ये नवी एआय टेक्निक दाखवण्यासाठी आपल्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या जाहीरातीमध्ये बार्डसमोर एका व्यक्तीने प्रश्न विचारला की, 'James Webb Space Telescope ने असं काय शोधलं की मी माझ्या ९ वर्षांच्या मुलाला सांगू शकेन. बार्डने त्वरित दोन उत्तरे दिली. मात्र त्यातील दुसरे उत्तर चुकीचे निघाले. बार्डने लिहिले की, टेलिस्कोपने सौरमालेच्याबाहेर कुठल्याही ग्रहाचा पहिला फोटो घेतला. तर याचं योग्य उत्तर युरोपियन सदर्न ऑब्जर्वेटरीच्या   Very Large Telescope ने  २००४ मध्ये असं होतं. नासाकडून याला दुजोरा मिळाला होता.  

टॅग्स :पैसाशेअर बाजार