Join us

भारतात येणाऱ्या मनीआॅर्डर घटणार

By admin | Published: January 11, 2016 3:05 AM

कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड घसरल्याने तेलाचा प्रभाव असलेल्या या देशातून मनीआॅर्डर येण्याचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती असोचेमने दिली

नवी दिल्ली : कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड घसरल्याने तेलाचा प्रभाव असलेल्या या देशातून मनीआॅर्डर येण्याचे प्रमाण कमी होईल, अशी माहिती असोचेमने दिली आहे. असोचेमने म्हटले आहे की, याचा प्रभाव केरळमध्ये अधिक प्रमाणात दिसून येईल. कारण येथील प्रत्येक दुसरे कुटुंब हे अशा मनीआॅर्डरवर अवलंबून आहे. यामुळे पंजाब, उत्तर प्रदेश यासारखे राज्यही प्रभावित होऊ शकतात. या भागातून मोठ्या संख्येने कामगार, कर्मचारी अशा देशात कामाच्या शोधात जातात. ११० देशांत असलेल्या दोन कोटी भारतीय नागरिकांपैकी किमान ६० ते ७० लाख लोक हे तेलसाठा असलेल्या अशा देशात आहेत. यातील २० लाख नागरिक एकट्या केरळ राज्यातील आहेत. असोचेमने म्हटले आहे की, कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने तेल उत्पादक देशात किंमत युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती ११ वर्षांच्या नीचांकावर आहेत.याशिवाय ऊर्जा क्षेत्रातील नवी गुंतवणूक सध्या थांबलेली आहे, याचा परिणाम पर्यटन, रिअल इस्टेट, बँकिंग आणि एकूणच अर्थव्यवस्थेवर होत आहे.