नवीन वर्ष कसे असेल कोणालाही त्याची कल्पना नाही. घरातील महिलांकडील पैसे गेल्या पाच वर्षांत दोनदा बाहेर आले आहेत. पहिल्यांदा नोटबंदीवेळी आणि दुसऱ्यांदा कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनवेळी. २०२२ च्या सुरुवातीला कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटमुळे तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे महिलांनी आतापासूनच नवीन वर्षाच्या आर्थिक सक्षमतेच्या तयारीला लागणे गरजेचे आहे. फायनान्शिअल प्लॅनिंगसाठी आतापासूनच तयारी करणे फायद्याचे राहणार आहे.
फायनान्शिअल प्लॅनर ममता गोदियाल यांनी सांगितले की, दोन वर्षांचा अनुभव आमच्यासाठी आर्थिक आणि शारीरिक दृष्या चांगला नव्हता. यामुळे या गोष्टींचा धडा घेऊन नव्या वर्षाची सुरुवात करायला हवी. यासाठी नियोजन करावे लागेल, जेणेकरून भविष्यातील अप्रिय घटनांना समर्थपणे तोंड देता येईल.
इमरजंसी फंड बनवावा...
नवीन वर्षात आपत्कालीन निधीची व्यवस्था नक्की करा. आपत्कालीन निधी हा घराच्या एका वर्षाच्या खर्चाइतका असावा. आणि हे काम एक स्त्री खूप चांगल्या प्रकारे करू शकते. कारण घरातील बजेट, मुलांचे शिक्षण किंवा इतर कोणत्याही खर्चात महिलांचा मोठा वाटा असतो. आणि ही गोष्ट कोणापासून लपून राहिलेली नाही, जेव्हा जेव्हा घरातील पुरुषाला पैशाची गरज भासते तेव्हा ती महिला आपल्या सिक्रेट पिग्गी बँकने ती गरज पूर्ण करते. म्हणून, एका महिलेने त्या व्यतिरिक्त आपत्कालीन निधी तयार करणे आवश्यक आहे.
अनावश्यक खर्चावर फुली मारा
ममता गोदियाल सांगतात की, घरातील ९० टक्के बजेट महिलांच्या हातात असते. त्यामुळे कोणता खर्च आवश्यक आहे आणि कोणता अनावश्यक आहे हे स्त्रीला चांगलेच माहीत असते. त्यामुळे नवीन वर्षात घराचे बजेट तयार करण्याची सवय लावा. या सर्व खर्चाची नोंद करा आणि नंतर बजेटमधून कोणते खर्च काढता येतील ते तपासा. प्रत्येक महिन्याची बचत करण्यात ही सुरुवात नक्कीच मोठी भूमिका बजावेल.
विमा जरूर काढा...
पर्सनल फायनान्स एक्सपर्ट ममता गोदियाल यांच्या मते, नोकरदार महिला विम्यासारख्या गरजांकडे लक्ष देतात पण घरात काम पाहणाऱ्या महिला विम्याला फालतू खर्च मानतात. मात्र, तसे नाही. आयुर्विमा सोबतच वैद्यकीय विमा हा घरगुती स्त्रीसाठी तितकाच महत्वाचा आहे जितका तो नोकरी करणाऱ्या पुरुषासाठी आहे. विमा हे केवळ भविष्यच सुरक्षित ठेवत नाही तर बचतीचे एक उत्तम साधन आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून विमा घेतला नसेल, तर नवीन वर्षात तो नक्की करून घ्या.